पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले आहेत. समाजाने पुरूष हाच 'पूर्ण माणूस' मानल्याने या परंपरा, रीतीरिवाजांची निर्मिती समाजातील पुरुषवर्गाने केली. परंतु आज विज्ञान, सामाजिक न्याय यांमुळे समाजधुरिणांना पटले आहे. की स्त्री ही टाकण्याभोगण्याची 'वस्तू' नाही. ती एक परिपूर्ण व्यक्ती आहे. 'माणूस' आहे. हा विचार शिक्षण... राजकारण... समाजकारण आदि विविध माध्यमांतून समाजात पेरणाऱ्यांची एक साखळी निर्माण व्हायला हवी. आणि हे आव्हान पेलण्यासाठी सुजाण, शिक्षित स्त्रियांनी दोन पावले पुढे रहायला हवे. पुरूषांचे हात हातात हवेतच. तेही परिपूर्ण माणुस आहेत. तरच अनेकींचे हरवलेले, अनेकींच्या जीवनात नव्याने येणारे वसंतऋतू पुन्हा अंगणात बहरतील, आणि खुल्या आवाजात गाता येईल.

हम चलेंगे साथ साथ
डाले हाथो में हाथ
हम होंगे कामयाब एक दिन.

 हरवलेला वसंत पुढील पिढ्यातील लेकीसुनांच्या अंगणात नक्कीच येईल.

१२२ / रुणझुणत्या पाखरा