पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संवेदनशील मनात उगवतात. त्यांची उत्तरे शोधकांनी शोधावीतच. खूप काही हाती येईल.
 पण आपण मात्र दशम्या, धपाटे, चटण्यांची चव तनामनात गोंदवून घेत महिनाभरात येणाऱ्या लुसलुसीत हुर्ड्याची, गवऱ्यांच्या आगटीची, लसणीच्या मीठ चटणीची, शेकलेल्या हुळा ओंब्याची नि नव्या गुळाची वाट पाहायची!!

रुणझुणत्या पाखरा / ११९