पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांचा त्यांनी आपली भूमिका बदलण्यासाठी आणि मुस्लिम जनमतातील स्थान कायम राहण्यासाठी सोयिस्कर वापर करून घेतला.
 ही योजना राबविण्याच्या वाटाघाटी चालू असतानाच ती फेटाळल्यानंतर लीगने प्रत्यक्ष कृतिदिन १६ ऑगस्ट १९४६ रोजी पाळावयाचे जाहीर केले. दंगलींच्या मार्गांनी हिंदूंना भेडसावण्याचे तंत्र जीनांनी आता अंमलात आणण्याचे ठरविले. प्रत्यक्ष कृती कोणाविरुद्ध' • या प्रश्नाला उत्तर देताना वरकरणी 'ही कृती हिंदूंविरुद्ध नाही' असे सांगत असतानाच ते म्हणाले, “तुम्हाला युद्ध हवे असेल तर आम्ही तुमचे आव्हान बिनशर्तपणे स्वीकारतो." .. (पहा - "Times of India" जीनांची पत्रकार परिषद, दि. १ ऑगस्ट, १९४६)
 दंगली करण्याची जीनांनी आता पुरती तयारी केली होती. १९४६ च्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी यादवी युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या. त्यांच्या या निवेदनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना 'न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे, "Jinnah left no doubt that he was first and . last Muslim." २२ मार्चला पाकिस्तानदिनाचा संदेश देताना त्यांनी कोणत्याही मार्गाने का होईना, (by all means) पाकिस्तान मिळविण्याची घोषणा केली. आणि प्रत्यक्ष कृतीच्या आधी ३१ जुलै १९४६ ला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी युद्धाची वल्गना केली. एका पत्रकाराने विचारले, "तुमची कृती अहिंसक राहील काय?" जीना उत्तरले, “मी हिंसाअहिंसेची इथे चर्चा करणार नाही.” "मग ती कोणत्या स्वरूपात राहील?" असा प्रश्न दुसऱ्या पत्रकाराने विचारला, तेव्हा “मी माझी योजना आत्ता जाहीर करू इच्छित नाही." असे जीनांनी सांगितले. दंगलीची योजना दंगलखोरदेखील जाहीर करीत नाही हे खरेच आहे. या पत्रकार परिषदेत "आम्ही आजपासून सनदशीर मार्ग सोडून दिले आहेत" असे त्यांनी जाहीर करून टाकले. लियाकतअली खान असोसिएटेड प्रेस ऑफ अमेरिकेच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम कोणताही असेल. प्रत्यक्ष कृती म्हणजे कायद्याविरुद्ध कोणतीही कृती असा अर्थ होतो." कलकत्ता मुस्लिम लीगच्या चिटणीसांनी प्रत्यक्ष कृतिदिनाचे आवाहन करताना काढलेल्या पत्रकातील उतारा येथे देणे उचित ठरेल. या पत्रकात म्हटले आहे -
 "मुसलमानांनी हे लक्षात ठेवावे की रमजान महिन्यात कुराण अवतरले आहे आणि . रमजान महिन्यात जेहादची परवानगी ईश्वराने मुस्लिमांना दिली आहे. रमजान महिन्यातच इस्लामची पहिली लढाई बदर येथे केवळ ३१३ मुसलमानांनी जिंकली आहे. आमचे जेहादही. रमजान महिन्यात सुरू होत आहे. ईश्वरा, आम्हाला काफिराविरुद्ध लढाईत विजयी कर. अरे काफिरा, तुझा शेवट आता जवळ आला आहे. आता कत्तली होणार आहेत."
 सरदार अब्दुल रब निस्सार म्हणाले, “पाकिस्तान रक्त सांडूनच आणि ते देखील बिगरमुसलमानांचे रक्त सांडून मिळवता येईल." (वरील बहतेक सर्व उतारे भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या "Let Pakistan speak for herself" या पुस्तिकेतून घेतले आहेत.)

 ही प्रक्षोभक भाषणे म्हणजे मुसलमानांना हिंदूविरुद्ध उठाव करावयास सांगणारा इशारा होता आणि बंगालमध्ये मुस्लिम लीग मंत्रिमंडळाने त्याचा योग्य अर्थ घेतला. बंगालचे तेव्हाचे लीगचे मुख्यमंत्री श्री. सुम्हावर्दी यांनी गुंडांना हाताशी धरले आणि दंगलींची सरकारीरीत्या

पाकिस्तानची चळवळ/७३