पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या प्रेरक भजनातील आशय विशेष लक्षात घेण्याजोगा आहे. संत तुकडोजी परमेश्वराजवळ वर मागतात, 'श्रीमंत गरीब एक दिलाने एक मताने सुखाने या भारतात नांदावेत.' भारतातील सर्व पंथ, आणि संप्रदाय यांच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद न उरता त्यात एकी असावी. कोणत्याही धर्माचे कोणीही असो, सगळ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्याचे सुख लाभू दे, असा वर देवा तू दे. आपल्या सर्व समाजाला मानवता, राष्ट्रभावना नीट कळू दे आणि सर्व ठिकाणी सर्वांच्या मिळून एकात्म भावाने प्रार्थना होऊ दे. नवतरुणांच्या बद्दलही राष्ट्रसंत तुकडोजींच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. तरुणांसाठी ‘ते सतत उद्योगी राहो, सदाचरणी आणि शीलवान नवयुवक असू दे' असे मागणे मागतात. आम्ही परस्परांतील, जाती जातीतील भेदभाव विसरून सगळ्यांनी एक व्हावे. आमच्यामध्ये त्यावेळचा रुजलेला अस्पृश्यतेचा कलंक मूळासकट या जगातून नाहिसा व्हावा. संत ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणेच त्यांचे हे मागणे आहे की खल, दुष्ट जे आहेत, त्यांच्या मनामनातही परिवर्तन घडून यावे आणि न्यायाने, सत्याने वागण्याची सद्बुद्धी ईश्वराने त्यांच्याही मनामध्ये जागृत करावी. 'जे खळांची व्यंकटी सांडो' यातील आशय हाच ज्ञानेश्वरमाऊलीने प्रगट केला आहे. याही पुढे संत तुकडोजीचे मागणे आहे की, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात स्वर्गीय सौंदर्य अवतरावे त्यातच सगळ्यांनी - रमावे, रंगून जावे. आपल्या मनात संकटांची जी भीती दडलेली (२२)