या पाळेगारास अनागोंदी ह्मणजे विजयानगर येथील राजानें आपले सत्तेखाली घेतले. तेव्हांपासून तो त्यांचे ताब्यांत गेला. पुढे पंधरावे शतकांत ह्मणजे सन १४३६ सांत अल्लाउदीनशहा बहावी यानीं हा किल्ला आपल्या ताव्यांत घेतला. तो पुढें १४७९ शींत अहंमदनगर सुभ्याचे ताब्यांत गेला. त्या नंतर सन १६३६सांत अहंमदनगरचे ताव्यांतून अदीलशाई बादशहा विजापूरचा यांनी घेऊन सिध्धीजोहार जंजीऱ्याचा× नवाब याचे ताव्यांत तो दिला. या नंतर श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचें शौर्य जसजसे उदय पावत गेलें. तसतसे त्यांनी जंजीऱ्याचे नवाबाचे ताब्यांतील रायगड, तळें, घोसाळें, वगैरे किल्ले आपल्या ताब्यांत घेतले. पुढे सन १६६२ ष्टांत महाराजांनी त्याचें जुनें नांव (रायरी.) बदलून रायगड, असें नवें नांव ठेविलें. तें हल्लींपर्यंत चालू आहे. त्यानंतर रायगडी गादी स्थापण्याचें जे समयीं महाराजांचे मनांत आलें तेसमयीं, आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार यांस रायगडावर बोलावून आणून राजवाडा तसेच इतर मुत्सद्दी यांस राहण्यास व आठरा कारखाने यांची सोय होईल अशा प्रकारची घरें, व वाडे, बांधून सर्व व्यवस्था
★ विजयानगर सांप्रत मद्रासइलाख्यांत आहे.
x जंजीरा रायगडचे पश्चमेस समुद्रकांठीं मोठा मजबूत किल्ला आहे. तो तेथील नबाबाकडे असून मुलूख चालू आहे. यास हबशी असेंही ह्मणतात.