पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

मनांत आणले असतां मन अगदीं उदासीन होतें , कीं इतकें मोठें कृत्य शेवटास जाईल कसें? पण मागील कितीयेक पुरुषांच्या यत्नाकडे पाहिलें असतां मनास एक प्रकारची हिम्मत येते. मुंबईस सेंट जेवियर नांवाचे एक स्कूल आहे त्याची उत्पत्ती अशी आहे कीं सेंट जेवियर नांवाचा एक मनुष्य होता, त्यानें असा निश्चय केला कीं प्रत्येक ख्रिस्ती मनुष्यापासून एकवार एक आणा वर्गणी घ्यावयाची. याप्रमाणें पृथ्वीवर जेवढे ख्रीस्ती धर्माचे लोक होते त्या त्या सर्वांकडून वर्गणी घेऊन एकत्र केली. ती रकम इतकी मोठी झाली कीं, त्या रकमेंतून एक लाख रुपयांची मोठी इमारत मुंबई येथें सेंटजेवीयरचे इंग्लिश स्कूलाकरितां बांधलेली आहे; व बाकी राहिलेल्या रकमेचे व्याजांत हल्लीं दरमहा पंधराशें रुपये पर्यंतचा खर्च चालतो.
 अमदाबादेस कांही मंदिरें अशीं आहेत कीं, तीं भीक मागणाऱ्या गोसाव्यांनीं बांधलेलीं आहेत. ह्मणजे त्यांनीं गांवोगांव भीक मागून पैसा एकत्र करून पन्नास पन्नास साठ साठ हजार मंदिरें बांधिलीं आहेत.
 आमच्या छत्रपति शिवाजी महाराज यांचे पायांपाशीं प्रेम नाहीं असा एकही हिंदु सांपडणार नाहीं; इतकेंच नाहीं अजून पुष्कळ हिंदु राजे असे आहेत कीं, ते शिवाजी महाराजांचे श्रमाची योग्यता व त्याणीं या भरत भूमीची जी सेवा केली त्याची खरी किंमत जाणणारे आहेत. हिंदुस्थानांत राजांचें दरबारांत जे भाटलोक गीते गात असतात त्यांत एक गीत असें आहे कीं-
" जो न होत सिवाजी, तो सुन्नत होत सबहुनकी "