पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७७ )


माझे समजुतीप्रमाणें आणखी तेथें सोई
असाव्या त्या.

→ɚןɞ←

 १ रायगड किल्ल्याचे आसपास चांगले कुलवान मराठे पुष्कळ राहतात त्यांस थोडेंसें तरी सहाय्य व्हावें असे विचार मनांत आणले असतां रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावानें धर्मार्थ दवाखाना स्थापावा.
 २ रायगड किल्ला जंगलांत व डोंगरावर असल्यामुळें ज्या लोकांचे मनांत छत्रपति शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शनास जाण्याचें येतें त्यांस शिधा सामोग्री वगैरे सर्व सामान घेऊन इतके लांब जावें लागतें, ही अडचण दूर व्हावी, व लोकांचे वळण रायगडावर जाण्याचें पडावें असे विचार मनांत आणले असतां त्या ठिकाणीं महाराजांचे नांवाचें अन्नछत्र असावें व त्या छत्रांतून कोणतेही जातीचा मनुष्य आला असतां त्यास एकवार भोजन मिळत जावें अशी व्यवस्था असावी.




शेवटील प्रार्थना !
≈≈≈≈°≈≈≈≈

 यांत मी जी व्यवस्था लिहिली आहे, ती सर्व होण्यास साधन जितकें द्रव्य पाहिजे तितकें एकत्र होऊन हैं कार्य शेवटास जाईल कीं नाहीं हे विचार