Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४२ )

टाकलें होतें. त्याचप्रमाणें राजवाड्यांतील एके भिंतींत आपली सापत्न मातोश्री सोयराबाई साहेब यांस जिवंत चिणून टाकलें होतें. दुर्वृत्त राजपुत्र सिंव्हासनावर आले असतां ज्ञानशुन्य होऊन कशीं अनन्वित कृत्यें करितात हें याजवरून आपणास चांगलें समजतें. बाणकवीनें चंद्रापीड राजाला, त्याची सिंव्हासनावर बसण्याची तयारी झाली असतां केलेला उपदेश प्रत्येक राजपुत्रांनीं ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. “ यौवनं धनसंपत्तिः प्रभूत्व मविवेकता ॥ एकैक मप्य नर्थाय, किमतत्र चतुष्टया " अर्थ:- एक गर्भश्रीमंती, दुसरें तारुण्य, तिसरें सौख्य, चवथें प्रभूत्व म्हणजे अधिकार या चारी वस्तूंतील प्रत्येक वस्तु तिचा विवेक रितीनें जर उपयोग केला नाहीं तर केवळ अनर्थाची खाणच होते. मग या चारी वस्तूंचा नियमीतपणा नष्ट होऊन अनियमीत पणानें जर एकत्र झाल्या तर यांचा उपयोग करणाऱ्या राजपुत्राची दशा काय विचारावयाची आहे. मग त्या राजाचे डोळ्यांची आकृति बाह्यता सुरफाटी दिसते मात्र; पण ते डोळे असतात उरफाटलेले. याजमुळें त्यास सर्वच उलट दिसतें. सन्मार्ग कुमार्गसा वाटतो. आणि कुमार्ग सन्मार्गसा दिसतो. अशा स्थितींतच मग तो राजा दुःखरूपीं नदीचे डोहांत बुडून मरण पावतो. तसाच प्रकार संभाजी महाराजांचा झाला. हें आपणास इतिहासावरून चांगलें समजतें.
 हिरकणी नावांचें टोंक जें पश्चिमेचे अंगास आहे, त्यास हिरकणी ह्मणण्याचें कारण असें आहे कीं,