उंची ५ फूट आहे. या दुकानाचे ओट्यांत नागप्पाचे दुकान ह्मणून एक जागा दाखवितात. हा व्यापारी मोठा प्रामाणिक व सत्यवादि होता, अशी प्रसिद्धी आहे. राजवाड्याचे उत्तरेस व गंगासागरतलावाचे समोर हत्तीखाना आहे. या हत्तीखान्याची लांबी ९० फूट व रुंदी २० फूट आणि उंची १२ फूट आहे. यांत सुमारें तीन चार हत्ती राहूं शकतील अशा निरनिराळ्या जागा आहेत.बाजाराचे दक्षिणेस होळीचें मैदान ह्मणून जागा आहे. येथून भवानी टोंकाचे अंगास गेलें ह्मणजे शिबंदी लोकांच्या रहाण्याच्या घरांची जोतों ओळीनेंच लागतात. येथेंच त्यांचीं पाणी पिण्याचीं टाकीं आहेत. येथून उत्तर आणि पश्चिम या मधील दिशेनें गेलें असतां शेवटीं जें डोंगराचें टोंक ( कडा ) लागतें. त्यास टकमकचा कडा असें म्हणतात. हा कडा भगदी सरळ व उतरता आहे. शिवाजी महराज स्वर्गवासीं झाल्या नंतर संभाजी महाराजांनीं जीं वाईट कृत्यें केलीं त्यांतील एके कृत्याविषयीं हा कडा प्रसिद्ध आहे. तसेंच दुसरे एके भयंकर कृत्याविषयीं राजवाड्यांतील एक भिंत प्रसिद्ध आहे. श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे अष्ट प्रधानांपैकीं राजारामाचे पक्षास अनुकुळ असलेल्या एका गृहस्थास संभाजीने या कड्यावरून कडेलोट करून मारून
*या व्यापायास शेषप्पा असें ही ह्मणत असत. शिवाजी महाराजास राज्याभिषेक झाला, ते समयीं जामदार खान्याचा कारभार याजकडे होता असा ही लेख आढळतो.