Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )

काय करितां " महाराज ह्मणाले "आईग ? मला तूं ओळखिलें नाहींस काय? अग मी तुझा शिव्या आहे बरें !! हा पहा? " असें ह्मणून डोकीचा तो भगवा रुमाल काढून पुनः महाराजानीं आईच्या पायांवर डोकी ठेविली. तेव्हां महाराजांची पाठ थोपटून मोठ्या स्वरानें जिजाबाई ह्मणाल्या कीं, "अरे, गोब्राह्मण प्रतिपालक माझा शिवबा कांरे तूं !!! " असे ह्मणून मातोश्रीनें पुत्रास ओळाखून पोटाशीं धरले! त्यावेळेस त्या मायलेकरांस किती आनंद झाला, त्याचें वर्णन येथें शद्वानें करितां येत नाहीं. त्याचा विचार वाचकांनींच करावा. त्यासमयीं जिजाबाईचे डोळ्यांस अश्रुधारा लोटल्या त्या कांहीं केल्या अटपतना, महाराजांनी पुष्कळ प्रकारें समाधान केलें, तरी आईचें रडें आंवरेना. शेवटीं महाराजांनीं आपलें डोकें आईचे पोटांत घालून हालविलें, आणि बालपणच्या लडिवाळपणानें तिचें शांतवन केलें. नंतर रायगड सोडल्यापासून ज्या ज्या गोष्टी घड-


 *महाराज दिल्लीस गेले. ते समयीं बरोबर एक हजार स्वार, पांचशें पायदळ इतकें सैन्य घेतलें होतें. युवराज संभाजी महाराज व आपले तैनातीची मिळून खासगी पैशाची एकंदर पन्नास मनुष्ये मात्र घेतलीं होतीं. ( अलीकडे सन १८७७ सालीं दिल्ली येथे दरबार झाला. हिंदुस्थानचे सर्व राजे रजवाडे आज्ञांकितपणाच्या सनदा घेण्याकरितां तेथें गेले होते. त्यासमयीं लष्कर बरोबर