Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

नेमलेलें इनाम दिलें. नंतर तो ज्या वाटेनें वर आला होता ती वाट मजबूत रितीनें बंद करून टाकली.




महाराजांची थोडीशी
कारकीर्द.
—∘<>∘—

 सन १६६४ सालीं शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर मोहीम करून पुष्कळ द्रव्य आणिलें. याच साली पुढे महाराजांनी आपल्या नांवास राजा हे पद जोडलें.
 सन १६६६ ष्टांत जयपूरचा राजा जयसिंग ज्यास सवाई जयसिंग असे ह्मणतात. तो शिवाजी महाराजांशीं लढण्यास आला असतां महाराजांनी त्यास निरोप पाठविला की, "आपण हिंदू अहां, याजकरितां आपल्याशी मी लढत नाहीं. तुह्मीं आह्मीं एक धर्मांतील, एक राष्ट्रांतील आहों तेव्हां तुह्माशीं लढणें शास्त्राप्रमाणे पाप आहे. मी तें करीत नाहीं" जयसिंगानें बादशहाचे हुकुमाप्रमाणे लढाईची सर्व तयारी करून आपलें सैन्य समरंगणी उभें करून शेवटचा निरोपही पाठविला. शेवटीं निरूपाय होऊन महाराज तह करण्यास तयार झाले. नंतर जयसिंगाचे सांगी प्रमाणे त्यांनीं आपल्यास अवरंगजेबाचे ताब्यांतील सरदार असें ह्मणवून घेतलें.