पान:रामायणे भाग पहिला.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ मोरोपंतकृत अम रनदीतें उतरुनि, गुहसंगें, अग्रजांघ्रिलाभरतें; । मग, चित्रकूटपर्वतवनवासी राम वंदिला भरतें ॥ कंज दलायतलोचन, वल्कलवासा, जटी महालिंगी, । जयशाली, यशशाली, राम प्रेमेंकरोनि आलिंगी. ॥ पाय वसिष्ठमुनीचे वंदुनि, जननीजनास तो वंदी । मंदीकृतवनवासक्केश, महाधीर, वीर, आनंदी. ॥ पौरा मात्यनतांधी ऐके जो राम तातमरणातें; । तों ये मोह मनासी, नेत्रांसींही महातम, रैणातें ॥ शम वी वसिष्ठ राघवशोकज्वलनासि बोधेभुवनानें; । ध्रुवनानेकाभीष्टद तर्पी तातासि तो विभु बनानें ॥ अंजलि रचूनि, भरत, स्तबुनि, म्हणे, 'मैथिलीश्वरा ! ज्यातें । जें योग्य तेंचि द्यावें; तूंचि विभो ! योग्य विश्वराज्यातें ॥ नय निपुणा ! धर्मज्ञा ! नाहीं लोकांत तूजपरि वेत्तो; । क्षोणीवरणें होइन, तुज 'पैरिवित्ती करोनि, 'पैरिवेत्ता ॥ भज न तुझ्या चरणाचें, हें राज्य प्राज्य दे मला देवा !; । न मज वियोगज्वलनीं, होमीं हो; मी करीन पदसेवा ॥ की य हि तुझ्या वियोगें दुर्वह, भूभार हा कसा वाहूं? । काय कृपा झाली ते ? कां तूं यजितोस लोकसा बा ! हूं.' ॥ हैं रा यिताश्रुधारें, 'हा राम !' असे विलाप त्या भरतें । केले जे तच्छ्रवणें आलें प्रभुच्या दयाब्धिला भैरतें ॥ ‘श्र म लासि; जा पुरीला; येइन सरतांचि वर्ष चवदावें; । ताताज्ञानिरतातें, भरता ! मातें, अणीक न वदावें ॥ तो श्री सीतापतिला भरत म्हणे, 'न करितां कृतावधिला; । शपथपुरःसर कथितों, होइल लोकांत अनुज तूं वधिला. ॥ ता रा वयासि मजला, दुःखसमुद्रांत पदुकातरणी, । तैरैणिकुलालंकारा ! दे; ज्या करितात पापघात रणीं.' ॥ or ९८ ९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०७ १. गंगेतं. २. रामपदलाभरते. ३. कमलपत्रासारिखे विस्तीर्ण नेत्र ज्याचे असा. ४. ऋषिरूप- धारी, ५. नगरवासी लोक आणि प्रधान यांणीं नमिले पाय ज्याचे असा. ६. मोठा अंधकार. ७. शब्दातें. ८. रामशोकाग्नीस ९. ज्ञानोदकानें १०. अनेकलोकमनोरथपूरक. ११. उदकें. १२. ज्ञानी. १३. परिवेत्याचा बंधु. १४. ज्येष्ठबंधूचा विवाह न होतां कनिष्टबंधूचा विवाह झाला तो. १५. देहहि. १६. हारवत् अश्रुधारा ज्याची १७ भरती, १८ पादुकारूप नौका. १९. सूर्यकुलभूषणा.