पान:रामायणे भाग पहिला.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० मोरोपंतकृत देहीं आत्मा, तैसा आर्यात मंत्रवर्ण सांग वसे; । सूक्ष्मदृशावांचुनियां कथापरालाचि तो कसा गवसे ! ॥ श्रीकार असे पूर्वी सर्वग्रंथांतरांत रा जाणा, । अंतीं मकार, एवं श्रीराम असें तरी मनीं आणा. ॥ सर्वत्र एक आत्मा, म्हणउनियां वंदिती जसे ज्ञानी; । हा ग्रंथ मंत्रगर्भित, यास्तव नमिजेल सर्व सुज्ञानीं ॥ मंत्रास्पद यास्तव हा ग्रंथ कवीला असे सदा हितसा; । गरुडासि रैमापतिपदपद्मांकितमूर्धकालियाहि तसा ॥ नृपमुद्रांकित पत्र प्रजेसि होतें जसें शिरोधार्य; । प्रभुचरित मंत्रचिन्हित, यास्तव धरितील मस्तक आर्य. ॥ आर्यकथाछंदानें आर्याछंदेंची जन्मलीं सरलें; । यांहीं माझें तनुवाक्कर्ममन:पाप सर्वथा सैरलें ॥ गीर्वाणशब्द पुष्कळ, जैनपदभाषाचि देखतां थोडी, । •यास्तव गुणज्ञलोकीं याची घ्यावी हळूहळू गोडी. ॥ प्राकृतसंस्कृतमिश्रित, यास्तव कोणी म्हणेल जरि कंथा; । भेवशीतभीतिभीतस्वांताला दाविला बरा पंथा. ॥ कोठें दूरान्वितपद, कोठें चुकली असेल 'यंतिमात्र; 1 अतिमात्र दोष ऐसें, न वदोत कवी समस्त गुणपात्र ॥ ग्रंथीं अष्टादशशत आर्या, आणीकही पुढें ऐशी; । चतुरूनसार्धशतमित मंत्रहि, संख्या विलोकिजे ऐशी ॥ बालकांड. श्रीकांतपत्र नारद भगवत्पदपद्मभृंग, संद्योगी, । आला वाल्मिकिमुनिच्या स्थानाला तो जगद्वितोद्योगी ॥ 'राघवचरित्र भावें गावें' ऐसा करोनि उपदेश, । गेला हरिगुणकीर्तनपरवश तो नि जरपि, वरदेश. ॥ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २ १. सर्व ग्रंथांत २. मंत्रस्थान ३. कृष्णपद चिन्हित ज्याचें मस्तक असा कालिय सर्प. ४. श्रेष्ठरामकथा छंदानें. ५. आर्यावृ. ६. संपलें. ७. देशभाषांचि. ८. गोदडी. ९. संसाररूप थंडीच्या भयानें भ्यालें जें मन त्याला. १०. विरामस्थान. ११. चारकमी दीडशें, म्ह० एकशें शेचाळीस. १२. उत्तम योगी १३. जगाच्या कल्याणाविषयीं उद्योग करणारा. १४. देवर्षी १५. वरदश्रेष्ठ.