पान:रामायणनिरीक्षण.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हाङमाव्रणावर मलम-डबीस किंमत ८८. परम्यावर औषध - सप्तकास किंमत २ रुपये. सुवर्णमालिनीवसंत - तोळ्यास ६ रु. लघुमालिनीवसंत सोळयास ४ रु. त्रिवगभस्म - तोळ्यास ३ रु. प्रकृतांचं मान सविस्तरपणे कळवून औषधे मागविल्यास इतर रोगांवरच्या औषधाचीही योजना करून औषधें व्ही. पी. ने पाठवूं. योजना की व औषधाचा सप्तकाचा चार्ज मिळून २ रुपये पडतील. प्रकृतीची हकीकत सविस्तर लिहावी. पश्नाचे उत्तरासाठी तिकीट ८॥ आण्याचे पाठवावें, वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे, पुणे. स्वामी रामतीर्थ यांचे समग्र ग्रंथ. संपादकः-- भास्कर विष्णु फडके, बी. ए. रामकृष्ण वासुदेव बर्वे, बी. ए. श्रीमत् परमहंस स्वामी रामतीर्थ हे विसाव्या शतकांतील अवतारी पुरुष होत. ह्या महात्म्यानें अमेरिका, ईजिप्त, जपान, वगैरे देशांत वेदान्तावर घ्याख्याने देऊन सनातन हिंदु धर्माचें श्रेष्ठत्व सर्व सुशिक्षित जगाच्या निदर्शनास आणून दिले, हे महाराष्ट्रीय बंधुभगिनीस माहीत आहेच. वेदा न्ताचें रहस्य समजावून देणाच्या ज्या व्याख्यानाच्या द्वारें स्वामींनी हे मह- त्कार्य घडवून आणलें, ती सर्व व्याख्यानें, तसेंच, त्यांचे लेख, कविता, पत्रे, सारांश, स्वामींचे समग्र ग्रंथ मराठींत प्रसिद्ध करण्याचे योजिले आहे. फ्राऊन सोळा पेजी सांच्याच्या दीडशे पृष्टांचा एक व्या सुमारें आठ भागांत है कार्य पुरे करण्याचा मानस आहे. समग्र ग्रंथापैकी दोन भाग प्रसिद्ध झाले असून तिसरा भाग पौषांत प्रसिद्ध होईल, व पुढील प्रत्येक भाग तीन महि- न्यांनी निघत जाईल. स्वामींच्या उपदेशाबरोवर स्वामींच्या दर्शनाचाहि नित्य लाभ घडावा म्हणून निरनिराळ्या पेहरावांतील स्वामींचा एकेक प्रकाशलेख दर भागांत येणार आहे. समग्र ग्रंथांच्या प्रत्येक भागाची किंमत कागदी बांधणी वारा