पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. the विष्णुपुराण, and if we assign to the महाभारत the orthodox date viz. 3102, B. C. we may believe that राम lived about 3880 B. C. or taking 1500 B. C. as the date of कृष्ण ( arrived at by Mr. Tilak and other's on the esidence of the self-same विष्णुपुराण and an inter- val of 780 years between रामं aud कृष्ण, we may put him in 2280 B. C. " यांत रा. ब. वैद्यांकडून नजरचुकीनें २९ च्या बद्दल ३९ आंकडा (पिढ्यांचा ) पडला आहे; व त्यामुळे ७८० वर्षे अंतर त्यांनी धरिलें आहे. मीं पिढीस २२ वर्षे धरून ३० पिढ्यांस सुमारे ६६० वर्षे दिलीं आहेत व भारतीय युद्धाचा अगदी प्राचीनकाळ मृ.. १५०० धरून इ. पू. २१६० चा सुमार हा रामायणकाळ आणिला आहे. माझें पुराणनिरीक्षण बाहेर पडल्यानंतर जरी रा.. ब. वैद्यांनी भारतकाळाविषयीं इतका विरोध प्रगट केला, तरी रामा- यणाचें कोडे सोडवितेवेळी त्यांच्या मनाची या प्रश्नांविषय काय स्थिति होती, हें वरील उताऱ्यावरून कळून येतें. असो. ( ३ ) वाल्मीकीचा काळ - तैत्तरीय प्रातिशाख्य ५ - ३६ मध्यें, पकारपूर्वश्च वाल्मीकेः । याप्रमाणें वाल्मीकीच्या मताचा उल्लेख आहे. या प्रातिशाख्यावर वररुचीची टीका असल्यामुळें वाल्मीकि वररुचीहून तर ठरतोच; पण Bibliotheca Indica मध्ये या प्रातिशाख्याचें संपादन करणाऱ्याचें असें मत आहे कीं, प्रातिशाख्याचा कर्ता व यास्क यांचेहि पूर्वी असावा. ( प्रस्तावना, पृ. ६ पहा ). यावरून