पान:रानवारा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हॅ, ऽऽ तसलं तिच्याबाबतीत करायचं मनाला रूचणार नाय आरं, झालंय काय तुला ? मला ह्ये कोडं सुटंना बग." 66 तुला न्हायच कळायचं मी सांगतो पंमद बयाजवार ऐक काल आसं झालं मला ती भैरूबाच्या देवळाम्होरं दिसली. मी तिला आडवा होऊन उभा व्हायलो म्हणून ती वाजू देऊन जाया लागली. तसं मी तिला हाटकलं ती भेदरून उभी व्हायली. मी तिला म्हणलं, “मला तुज्यासंगट खाजगीत बोलायचाय ' तर म्हणली, " मग आसं चव्हाट्यात कशाला ? घरी ये को,' मी म्हणलो, 'घरी याला तुझ्या बाचं भ्या हाय काय ? कधी येऊ ते साग,' तर खूष होऊन म्हणली, “ मग आज दुपारी ये.' त्या परमानं मी दुपारी तिज्या घरी गेलो." " बा आसंल तिचा घरात." माज्या." "6 “ तसं न्हाय रं. तू मधी बोलू नगस. .. तर काय झालं मी तिच्या घरी गेलो तवा ती एकटीच हुती. मला बघून ती खूष झाली तिनं मला माचावर बसायला सांगितलं. मी बसलो. भग ती म्हणली, " दूध आणते गरम करून.' आत गेली ती आलीच नाय लवकर, तेवढयात शेजारची सुभान्याची थेरडी तिथं येऊन बसली. ती गेलीच नाय. तिनंच डाव नासीवला संमदा." तिनं काय केलं रं ?" " गप्प रं तू, मधीच त्वांड खुपसतूस्. ऐकून तर घे रतं. तर मी म्हणत हुतो . हं त्या येळला ती भवानी दूध घेऊन भाईर आली. आन् आन्. तिनं त्या म्हातारीसमूर माझ्या हातात राखी बांधली. मला वाचा बसल्यावाणीच झालं. माझं डोक्स आगदी औट झालं तिथंन उठताबी येईना चशिरी. त्यात त्या थेरडीनं लावलं पुराण "भनी-भावांडाचं नातं आसं आसतं, अन तसं आसतं." मला आस्सी झोट आली. थोड्या टाइम्बानं मी जयाला म्हणलं माझं डोक्स दुखतंय मी जातो. तिच उत्तर ऐकायलाबी थांबलो न्हाय, पर तीच दरवाज्यापातूर आली. म्हणलं बरं झालं चांगली झाडायला ईल. तावातच मी म्हणलं, “ ह्यं मला इचारून बांधलंस का ? " तर म्हणाली, " त्यात इचारण्यासारखं काय आवघड हाय तुझ्यासारख्या कवळ्या टग्याला ह्ये लई शोभा देतं." सालीनं आजपातूरच्या संमद्या ? .. डाव । ३५