पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/660

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

•(p) इंग्रजी वर्णमालेतील सोळावे अक्षर. हे ओष्ठय व्यंजन आहे. ह्याची अनेकवचनें Ps, Ps, p' अशी लिहितात. प्राचीन इजिप्शन लिपीतील ध्वनिदर्शक मूळ चित्राक्षराचें (लि) रूपांतर होत होत जाऊन त्याचे फिनिशन भाषेतील (१) हे अक्षर बनले. त्याचे ग्रीक भाषेतील 'पाय' (T) सारखे अक्षर झाले; व ह्या ग्रीक 'पाय' सारख्या अक्षरापासून ल्याटिन व इंग्रजी भाषांतील P ह्या अक्षराची उत्पत्ति झाली असें युरोपियन वर्णविदांचे मत आहे. व्युत्पत्तिदृष्टया काही शब्दांत 'b', , ह्या अक्षरांच्या ठिकाणी P चा आदेश होतो; जसे, "Hobble, hopple; father, paternal; receive, recipient.” P या अक्षराचा मराठीत असा उच्चार होतो. परंतु P आरंभी असून त्याच्यापुढे n किंवा किंवा ' ही अक्षरे आली तर P अनुचारित राहते; जसे, pneumatic, psalm, Psolemy; काही शब्दांत m व दुसरें एखादं व्यंजन यांच्यामध्ये जर P अक्षर आले तर P अनुच्चारित राहते; जसे, Hampstead, Hampton, Sampson, Thompson. ल्याटिनमधून आलेल्या Exempt, Tempt, Consumptive, Peremptory, Assumpsit इत्यादि शब्दांत P चा उच्चार अगदी थोडा होतो, ७ घाईघाईने बोलतांना तर तो होत नाही असेंच वाटते. मराठी चा उच्चार व इंग्रजी 'PH' यांचा संयुक्त उच्चार हे अगदी भिक्ष आहेत. २ गणितशास्त्रांत कोणत्याही श्रेढीतील पंधरावे किंव सोळावें पद दाखविण्याकरितां P ची योजना करतात. (a) To be P and Q, to be of prime quality