पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/958

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लब्धीत किंवा 'चलनकलन' गणितांत तात्कालिक गतीसाठी किंवा शून्यलब्धी ( Differentiation) साठी हे अक्षर घालितात. तसेंच उच्चगणितांत. वक्राची न्यूनता (deficiency of a curve) दाखविण्यासाठी D हे अक्षर इंग्रजी गणिती योजितात. ७ Daniel, David, Duke, Degree, Domini इत्यादि शब्दांचा संक्षेप म्हणून इंग्रजीत D हे अक्षर केव्हां केव्हां योजण्यांत येते, पदव्यांमध्ये D ह्या संक्षेपाचा बहुधा Doctor असा अर्थ असतो; as, D. Sc.= Doctor of Science. ८ रोमन लिपीमध्ये ५०० ह्या संख्येबद्दल D ह्या अक्षराचा उपयोग करतात. [ In this use it is not the initial of any word or even strictly a letter but one half of the sign (D or (D the original Tuscan numeral for 1000.] ९ D or d is also used to indicate a penny or pence, being then the initial letter of Latin Denarius, a silver coin equal to 8 3/4 pence. पेनी f, पेन्स. १० D stands for 5000. D वर आडवी रेष दिली म्हणजे ते चिन्ह पाच हजार ही संख्या दाखविते.