पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/946

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चमत्कारिक रीतीने, तऱ्हेवाईक रीतीनें. ३ कळाकुसरीने, करामतीनें. Cu'riousness n. Curious arts n. (obs.) जादु m. Curl (keal) [Akin to D, krullen. Dan. krolle, dial.Swed. krulla, to curl, probably akin to E. crook.] v.t. कुरळ करणे. २ मुरडणे, वळवणे, मुरड घालणें. ३ वेंटाळे घालणे. ४ ( झुलुपाने) सुशोभित करणे-शृंगारणे-अलंकृत करणे; as, "Curling with metaphors a plain intention." ४ उसळणे, तरंग उठविणे; as, "Seas would be pools without the brushing air to curl the waves." C. v. i. वेंटाळणे, कुरळ होणे. २ तरंग उठणे, लहरी-लाटा घेत चालणें. C. n. केसांचें वेटोळें n, कुरळ केसांचा झुबका m, झुलूप n, कुरूळ n, कुरल n, अलक (S.) m. २ तरंग m, लाट f. ३ बटाटे वगैरेंवर पडणारा एक रोग m. (ह्याचे योगाने झाडांची किंवा वेलींची पाने मुरडून खुरडतात.), मुरडी f, खुरटी f. Curled a. कुरळ, कुरल, मुथाळ (obs.), मुध्याळ (obs.), मुद्याळ (obs.). Curled-pate a. (obs.) कुरळ केसांचा. Curl'er n. मुरड घालणारा, मुरड घालणारी वस्तु f. २ 'कर्लिंग' खेळ खेळणारा. Cur'liness n. Curl'ing n. See Curl n. Curling irons, Curling tongs n. pl. केस कुरळे करण्याचे लोखंडी हत्यार n. (किंचित् तापवून त्या सभोवती केस गुंडाळले म्हणजे ते कुरळे होतात.) Curling stone n. 'कर्लिंग' खेळांतील मूठ असलेला जड धोंडा m. Curl'y a. Same as Curled. Curlew ( ker'lū) [ Fr. corlieu, curlew.-L. currere, to run & levis, light.] n. चोंच व पाय लांब असलेला व आखूड शेपटीचा पक्षी m. Curling (kur'-ling) n. (धुराचें) कुरळ. २ कुरळ करणे n. ३ स्काटलंडांतील एक प्रकारचा पाण्यांतील-बर्फावरील खेळ खेळणे. (ह्या खेळांत चाळीस पौंड वजनाचे गडगडे दगड बर्फावरून किंवा गोठलेल्या पाण्यावरून फेंकून देतात, आणि खेळणारे आपला दगड नेमक्या ठिकाणी जावा व इतरांचा जाऊ नये म्हणून यत्न करीत असतात.) Curmudgeon (ker-mu-jun) [ Said to be derived from corn-mudgin, being considered in old times, the most grasping, miserly of men.] n. पैशाची खूब हांव असणारा-लोभी-कृपण-कद्रू-कंजूष मनुष्य m. Curmudg'eonly adv. लोभी-कद्रू-कंजूषपणाने. Currant (kur'unt) (From Corinth in Greece whence they were first brought.] n. बेदाणा m, मनुका f. २ एक प्रकारचे लहान फळ n. Current (kur'ent) [O. Fr. curant, corant pr. p. curre, corre, to run-L. currere, to run. ] a. धांवणारे, वाहणारे. २ साधारण, चालू, प्रसिद्ध, लोकप्रसिद्ध, व्यावहारिक. ३ चलनी, चालता. ४ चालता, मजकूर as in सालमजकूर, वर्तमान, विद्यमान; as, "C. month." ५ खरा (रुपया इत्यादि नाणे); as, “If thou be C. gold indeed." २ रूढ, रूढीतला; as, "C. word." C.n. ओघ m, प्रवाह m; as, " A C. of water and air." २ प्रवाह m, २ ओघ m, धार f, झोत m. (of water). ३ क्रम m, गति