पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/933

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Crotchet (kroch'et ) [ Fr. crochet, dim. from croc, a hook.] n. बेळकी f, दुबेळकी f, बेचकी f. २ print चौकोनी कंस m, बेळे n. ३ लहर f, तरंग m. Crotch'eted, Crotch'ety a. लहरी, लहरीदार. Crotch'eteer n. लहरी मनुष्य m. Croton ( kro'tun ) [Gr. kroton, a tick or mite which the seed of the plant resembles.] n. चंद्रज्योतीचें-(?) जेपाळाचे झाड n. Croton-oil n. जेपाळाच्या बियांचे तेल n Crouch (krowch) [ A softened form of crook.] v. i. दबणे, दबकणे, दबा धरून बसणे-असणे. २ हातापायांपायां पडणे, पदर पसरणे, लवणभंजन करणे. Croup (kroop) [AS. kreopan, to call.] n. कूप नांवाचा खोकला; ह्याचे पर्यवसान केव्हां केव्हां घटसर्पीत होते. C.v.i. Croup'iness n. Croup'ous, Croup'y a. Croup (krõõp) [Fr. croupe, hind quarters, the rump.] n. घोड्याचे ढुंगण n, ढिमोरा m , चौक m. Croupier (krõõ’-pi-er) [Fr. one who rides on the croup. ] n. (सार्वजनिक जेवणाचे वेळी) उपप्रमुख. २ जुगाराच्या टेबलावरचे पैसे गोळा करणारा. Crow ( kro) [A. S. crawe, & crow; crawan, to cry like a cock.] n. कावळा m, काक m, वायस m (S.). २ संबल f, तोमर f , तरफ f.. (of iron). ३ भारवणी f, आरव f, कोकणी f, कूक f, बांग f, साद f. [ SECOND C. दुसारणी.] ४ प्राण्यांच्या आतड्यांतील नरम त्वचा f. (ह्या अर्थी हा शब्द खाटीक लोक वापरतात.) C.v.i. आरवणे, कुकणे, साद देणे. २ आनंदाने ओरडणे, जयशब्द करणे (with over ). Crowed or Crew pa. t. Crowed pa. p. Crow-bar n. वांकड्या टोकाची-बांकदार तरफेची पहार f, कटवणी f. Crow-Keeper n. (Shakes.) पाखरांना भेडवण्याकरितां शेतांत जमा केलेला गवताचा पुरुष m, गवती भूत n. Crow-quill n. कावळ्याच्या पिसांची लेखणी f. Crow's-bill or Crow-bill n. surg. जखमेतून गोळी काढण्याचा चिमटा m- Crow'sfoot n. म्हातारपणी डोळ्याखाली पडणाच्या सुरकुत्या. Crow'snest n. naut. मोठ्या डोलकाठीवरचे खलाशाचें बसण्याचे ठिकाण n. As the crow flies (जसा कावळा सरळ जातो तसें) सरळ. Eat crow or eat boled crow मनाविरुद्ध काम करावयास भाग पडणे. Have a crow to pluck or pick with दुसऱ्याबरोबर भांडून काही तरी गोष्ट ठरविण्याची असणे. Crowd (krowd) [A. S. crudan, to press. ] n. जमाव m, घोळका m, थवा m, टोळी f, समुदाय m, समूह m. २ तेली तांबोळी m. pl., कोळीमाळी m. pl., कनिष्ठ प्रतीच्या लाेकांचा जमाव m- मेळा m. C. v.t . भरून काढणे, खेटून काढणे, रगडा-दाटी करणे. २ खेटवणे, दाटी करणे. C.v.i. दाटणे, खेटणे, भिडणे, आंत घुसणे; as, "A is into a room. ३ अडचण करणे. ४ लगट करणे, Crowd'ed p. t. & pa. p. गर्दी झालेला, गच्च भरलेला, &c Crowd sail naut. गलबताची गति वाढविण्याकरिता