पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/932

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cros'sing n. कूसा or कासासारखी खूण करणे n. Cross-section n. तिर्यक् छेद m, आडवा काट-छेद m. Cross-stitch n. दुहेरी टांका m.. Cross'let n. लहान क्रास-क्रूस m. Cross and pile नाण्याच्या उलट्यापालट्या बाजूचा खेळ m. To cross one's mind एखाद्याच्या एकदम मनांत येणे. To cross the path of any one मोडा घालणे, अडथळा करणे, मार्गात आडवें पडणें-होणें-आड येणे. The Southern cross (astro.) दक्षिणीय चतुष्पथ. Cross (kros) a. आडवा, वांकडा. २ विपरीत, उलटा, प्रतिकूळ. ३ दुःशील, दुरात्मा. ४ आमन्यासामन्याचा, अदलाबदलीचा. ५ खिसखिशा, खाष्ट, खंक, खंकाळ्या, खट्याळ, कटकट्या, खडतर, जिकरी, तिरसट, तिसकूट, हिरवट, तुटस, तुसडा. ६ संकराचा. [ CROSS BREED संकर-मिश्रजाति, भिन्नकुलोत्पत्ति.] C. v.t कूसाची खूणचिह्न करणे, एका रेघेवरून दुसरी रेघ ओढणे, फांटा मारणे. २ छेकणे, छका मारून रद्द करणे. ३ अडचण हरकत करणे, आडवा-वांकडा येणे, अवरोध-प्रतिरोधक करणे, मोडा घालणे. ४ अटकाव करणे, रोखणे. ५ ओलांडणे, उतरणें, उल्लंघणे, पार जाणे, तरणें. C. v.t ओलांडणे. Cross-action n. law. एकाच खटल्यांत उलट दावा m. Cross-armed a. हातास तिठा घालून. Cross-bar n. आडवा गज m. Cross-barred n. आडवे गज लावलेला. Cross-beam n. इमारतीच्या दोन्ही बाजूस बळकटी आणणारी मोठी तुळई f , खांडबार. Cross-birth n. (बाळंतपणाचे वेळी) आडवें येणें n. Cross-bones दोन मांडयांची हाडे एकमेकांना आडवी बांधून त्यावर घातलेली करवंटी f. ही एक मृत्यूची खूण असे मानतात: Cross-bow n. मोठ्या दांड्याला आडवे बांधलेले धनुष्य n, कुंद्याचा-दस्त्याचा कमठा m. Cross-bowman m. वरच्या प्रकारचे धनुष्य वापरणारा. Cross-country a. शेतांतला, शेतांतून. Cross-cut जवळचा आडरस्ता m. Cross examine v.t. उलट सवाल घालणे, प्रतिप्रश्न करणे, उलट तपासणी करणे. Cross-eyed a. तिरवा, काणा, चकणा. grained a. आडव्या शिरांचा, आडव्या दोराचा. २ आडगात्या, अडिवाळ. Cros'sing n. ( Rail) एका रुळावरून दुसऱ्या रुळावर जाणे, दोन आडव्या रुळांचा सांधा ओलांडणे, उतरणे. २ अवरोध m, प्रतिरोध m.३ ओलंडणी f, उतरण f. Cross-legged a. अढी घालून बसलेला. Cross'ly adv. Cross-patch n. दुःशील मनुष्य m. आडजात f. Cross-plough v. t. बेरणे, बेरणी करणे. Cross-purpose n. उलट हेतु m, मनसुबा m, एकान म्हणावें एक दुसऱ्याने समजावें दुसरें. To be aट cross purposes (न जाणतां) एकमेकांच्या विरुद्ध वागणे (विरोध करण्याचा हेतु नसतांनाही एकमेकांशी) विरुद्ध वागणे, एकमेकांशी विरुद्धपणाचें वर्तन होणे. Cross-question n. उलट प्रश्न-सवाल. Cross-road n. आडवा रस्ता m, आडवाट f. Cross-way n. चवाठा m,. तिवाठा m. Cross-vise a. आढवा, आड. Crotch ( kroch) n. बेळकें n, दुबेळके n, बेचके n , नांगे n. Crotched a.