पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/903

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दीच्या शब्दाहून भिन्न असा खुणेचा ज्यादा शब्द m, Counter-part n. उतारा m, पूरक भाग m, जोडीचा भाग m, जोड m, समानाकृतिकभाग. Counter-plea n. प्रत्युत्तर n, उलट तकरार f- सबब f- कारण n. Counter-plead v. t. विरुद्ध तकरार करणे. Counter-plot v. t. प्रतिकट-प्रतिकूट करणे, विरुद्ध कट-कूट करणे. C.n. विरुद्ध कट m. Counter-poise v. t. & n. See Counter-balance. २ music. प्रतिसाम्य n. Counter-poison n. विषमारक विष देणे n, एक विष उतरवणारे दुसरे विष n. Counter-pressure n. विरुद्ध दाब m- दडपण n, उलट बेत m. Counter-protest n. तकरारीवर तकरार f, प्रतिनिषेध m. उलट हरकत f. Counter-proof n. कोरलेल्या चित्रांचा छाप घेऊन त्या छापाची शाई ओली आहे तोच त्याचा प्रतिछाप घेणे n, प्रतिछाप m. Counter-revolution n. राज्यक्रांति करणाराविरुद्ध बंड n प्रतिबंध n. Counter-roll a. law. (दुसऱ्यावर दाब ठेवण्याकरितां ठेवलेल्या) हिशेबाची नक्कल f. Counter-round n. गस्त बरोबर घालतात की नाही हे पाहणारे अधिकारी m. व ह्याकरितां घातलेली गस्त f. Counter-scarp n. रेवणी f. Counter-seal,v. t. (Shakes.) दुसऱ्याबरोबर आणखी मोहोर करणे. Counter-security n. जामीन राहणारास हमी. Counter-sense n. खऱ्या अर्थाविरुद्ध अर्थ m, विपरीतार्थ m. Counter-shaft n. mech. eng. उपलाट f. Counter-sign v. t. मखलासी करणे, जोडसही करणे. Countersign n. खुणेचा शब्द m.२ मखलासी f, जोडसही f. Counter-signal n. जबाबी खूण f. Counter-signature n. मखलासी f, जोडसही f. Counter-sink v. t. खिळा बसविण्याकरितां छेदाचा कांठ निमुळता करणे. Counter-stand n. प्रतिकार m. C.v.t. प्रतिकार करणे. Counter-statement n. (एका जबानी विरुद्ध दुसरी) उलट जबानी f, प्रतिविधान n. Counter-stroke n. प्रत्याघात m, उलट गुद्धा m. Counter-tally n. पडरुजुवात f. Counter-time n. (घोडयाच्या चालीत) अडथळा m, प्रतिकार m, चालीची बदल f. Counter-turn n. अडचणीचा नवा प्रसंग m. Counter-vail v. t. समान शक्तिने दुसऱ्याच्या विरुद्ध वागणे,भरपाई करणे. Counter-view n. समोरासमोर असणे n, परस्पर सम्मुख स्थिति f. २ उलट बाजू. Counter-vote v. t. विरुद्ध मत देणे. Counter-weigh v. t. समतोल वजन करणे. Counter-weight n. समतोल वजन n. दुसऱ्या पारड्यांतील वजन n. Counter-wheel v. i. mili. उलट दिशेने चक्कर घालणे-घेणे. Counter-work n. उलट-विरुद्ध काम n. C. v. t. उलट-विरुद्ध काम-कर्म करणे. Counter-wrought p. a. Counterfeit ( koun'-ter-fit) [ Fr. contra (L contra), against & faire (L. facere ), to make. ] v. t. कपटांने सोंग-मिष-मीस-वेष घेणे, कपटानु-करण-कपटानु-कृति करणें, अनुकरणे, (फसविण्याच्या बुद्धीने) अनुकरण करणे. ३ बनावट-कृत्रिम-खोटा करणे. C. v. i. कुभांड-तर्कट रचणे, ढोंग करणे, खोटा वेष घेणे. २ खोटी-नकली वस्तु करणे-बनवणे. C. n. नकली पदार्थ m, मिष n, मीस n,