पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/902

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समतोल-समान ठेवणे-राखणे. C. n तुला-ळा f, धडा m, आभंड n. २ समभाराचा विषय m- गोष्ट f.३ समतोल m. Counter-blast n. विरोधी गोष्ट ; as, " The orange leaders replied by a. C.” Counter-brace n. तंग m. (इंग्रजी पद्धतीप्रमाणे तुमान व बंडी ही एकालाच जोडून शिवलली असतात व त्याला हे तंग असतात. ) Counter-buff n. प्रतिरोधक आघात m. धक्का m. C. v.t. धक्का देऊन मागे लोटणे, मागे ढकलून देणे-ढकलणे. Counter-cast n. पेंचास तोड f, कुलंगडें n, उलट कट m, विरुद्ध शक्कल f, खेकट्यास मेकटें m. Counter-caster (used in contempt) n आंकडेमोड्या, हिशेब्या, जमाखर्च करणारा, खरडेघाशा. Counter-change n. ( Shakes.) अदलाबदल f. Counter-changed n. अदलाबदल केलेला. Counter-charge n. प्रतिदोषारोप m Counter-charm v. t. उलट मंत्र करणे, प्रतिकारक मंत्र घालणे. C.n. उलट-प्रतिकारक मंत्र m. Counter-check v. t. अडथळा आणून थांबवणे. C. n. (रोधास) प्रतिरोध m. Counter-current n. विरुद्धप्रवाह m. Counter-drain n. (कालव्यांतून बाहेर झिरपणारे पाणी जाण्यासाठी केलेला कालव्याशी समांतर) प्रतिपाट m, झिरप्याचा पाट m. Counter-draw v. t. तेलकागदावर अगर इतर पारदर्शक पदार्थावर गिरवून प्रतिचित्र काढणे; as, " Schoolboys place an oiled paper on a map & then trace it. This process is called counter-drawing.” Counter-evidence n. (पुराव्याच्या) उलट पुरावा m, विरुद्धसाक्ष f. Counter-extenstion n दीर्घीकरणावरोध, प्रतिविक्षेप m. Counter-foil n. स्थळप्रत Counter-force n. विरुद्ध जोर m. Counter-fort n. (.fort. ) लहान तट m-कोट m-भिंत f. Counter-gauge n. (carpenty) a method of measuring joints सांधे मोजण्याचे माप n. Counter-influence n. उलट तोलाचे वजन n, किंवा वशिला f. Counter-irritant n. प्रतिदाहोत्पादक, प्रतिदाह उत्पन्न करणारे. Counter-irritation n. (med.) (शरीरांतील रोगजन्य दाह नाहींसा करण्याकरितां औषधाने) प्रतिदाह उत्पन्न करणे n, प्रतिदाह m. Counter-light n. अवरोधक प्रकाश m. Counter-march n. उलट-परत-फेर कूच m, प्रत्यागमन n. C. V.i. ( mil. ) फेर-परत कूच करणे. Counter-mark n. प्रतिलक्षण n, प्रतिचिन्ह n. २ घोड्याचे वय कमी दिसावे ह्यणून त्याच्या दांतांत केलेली खळगी f. C. v. t. प्रतिलक्षण-प्रतिखूण करणे. २ घोड्याच्या दातांत खळगी करणे. Counter-mine v. t. (शत्रूच्या सुरूंगाचा पत्ता काढण्यासाठी) प्रतिसुरुंग करणे. २ fig. गुप्त कारस्थानाने एखाद्याची मसलत फसविणे. C. n. प्रतिसुरुंग m. २ fig. उलट शक्कल f. पेंच m- युक्ति f. Counter-motion n. विरुद्धगति f. Counter-move, Counter-movement n. उलट चळवळ f, विरुद्ध दिशेची हालचाल f, प्रतिचलन n. Counter-mure v. t. कोटाच्या आंत कोट करणे, पड़र्भित करणे. C. n. ( R.) पडभिंत f, पडकोट m. Counter-opening n. विरुद्ध बाजूचे भोंक n. छिद्र. Counter-pace n. उलट उपाय m. Counter-parole n. धोक्याच्या प्रसंगी वापरण्याचा ठराविक वर