पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/888

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Corpse-candle n. प्रेत पुरण्याचे आदले दिवशी त्याजवळ लाविलेली मेणबत्ती f, स्मशानांत दिसणारा मेणबत्तीसारखा उजेड m. Corpse-gate n. स्मशानद्वार n. Corpulence ( kawa'-pu-lens ) See Corpus below. Corpus (kawa'-pus) [ L. corpus, the body. ] n. a body शरीर n, (निर्जीव अथवा सजीव) देह m, काया f. २ जडवस्तु f. ३ एखाद्या विषयावरील सर्व वाङ्मय n. Cor'pulence, Cor'pulency n. ढमालेपणा m, दुलदुलीतपणा m, मेद m, मेदोवृद्धि f, मेदोवात m, भोपळ्या रोग m ( colloq.), स्थौल्य n, स्थूलता f, मेदोबाहुल्य n. Cor'pulent a. fleshy,bulky ढमाल or ढमाल्या,कापशा, धोनशा, मेदोवृद्धीचा, स्थूल, स्थूलकाय, फोपशा. Cor'pulently adv. Cor'puscle n. रज m, कण m, अणु m. २ anat. रक्तगोलक m. also Corpuscule (obs.). Corpus'cular, Corpuscul'a’rian a. Corpus'culāʻrian n. an adherent of the corpuscular or atomic philosophy परमाणु हे सर्व वस्तूचे अत्यंत सूक्ष्म घटक आहेत असे मानणारा-सूक्ष्मपरमाणुवादी, सूक्ष्मवादी. २ an adherent of the corpuscular theory of light तेजःपरमाणुवादी. Corpuscular'ity n. Corpus delicti गुन्हा शाबीत करप्यास लागणारा अवश्य पुरावा. Corpuscular theory of light or Emission theory तेजःपरमाणुवाद. Corpus Christi N. त्रिने(नि)टी रविवारच्या नंतर येणाऱ्या गुरुवारी युखरिस्ताच्या प्रीत्यर्थ उत्सव किंवा सण. Corradiate ( kor-rad'iat) v. i. एकाच बिन्दूंत (विद्युत किंवा प्रकाश) किरणांचे संमेलन होणे, प्रकाशकिरणाचे केंद्रीभवन होणे. Corradia'tion n. केन्द्रीभवन. Corral (kor-ral') [Sp. corral, a yard for cattle. ] n. गोठा m, मेंढबाडा m. C. V. t. मेंढवाड्यांत घालणे. Correct (kor-rekt') [L. corrigere, correctum cor, intens. & regere, to rule. Correct literally means to bring to a conformity with a settled standard rule. ] v. t. to make right, to rectify (ठराविक प्रमाणानियमाबरोबर आणण्याकरितां) सुधारणे, (शी) तंतोतंत करणे, निटावणे, नीट-शुद्ध करणे; as, "To C. manner" २ to chastise, to chasten, to punish शिक्षा f-करणे-देणे-लावणे, वाटेवर आणणे. ३ (med.) to obviate or remove, to unteract or change समधात-दोषनिरास m-दोषापहरण n. करणे, निर्बाधता f, आणणे, दोष m- विकार m मोडून टाकणे; as, "To C. the acidity of the stomach." ४ ( a literary work ) चुकी f.काढणे, शोधणे, शोध (S.) m, शोधन (S.) n. करणे g. of o., शुद्ध करणे "To C. the proofs." C. a. just, proper बराबर, तंतोतंत, नीट, ठीक, दुरुस्त, यथायोग्य, शिस्तवार. २ esp. (of com duct or of language) नीट, ठीक, शुद्ध, विशुद्ध, निर्दाेष, दोषहीन-शून्य. Correct'able, Correct'ible a. सुधारता येईल असा, शुद्ध करिता येईल असा, शुद्धिपात्र-क्षम Correc'ted a. सुधारलेला, निटावलेला, नीट केलेला. शुद्धीकृत. ३ शिक्षा केलेला, शासन केलेला, दंडित Correct'ly adv. बरोबर, ठीक, नीट, यथायोग्य, यथायुक्त