पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/889

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चुकीवांचून, बिनचूक. Correc'tion n.-act. बरोबर करणे n, निटावणे n, नीट करणे n, सुधारणी f, सुधारणूक f, दुरुस्ती f-act. शोधणे n, शोध m, शोधन n, शुद्धि f, विशुद्धि f. २ शिक्षा करणे n, शिक्षा f. देणे n, शिक्षा f, शासन n, पारिपत्य n, तंबी f. [ HOUSE OF C. तुरुंग m, कोंडा f, कैदखाना m.] ३ an error corrected शोध m. ४ med. abatement of noxious qualities दोषशोधन n, निर्वाधीकरण n, विकार मोडणें n. ५ an allowance made for the inaccuracy of an instrument संस्कार m, वीजसंस्कार m. Correc'tioner n. (Shakes.) उनाड लोकांच्या शाळेतला. Correct'or n. सुधारणारा, शिक्षा करणारा, तंतोतंत करणारा. Correct'ive a. सुधारणाशिक्षा-शुद्धि &c. करण्याची शक्ति असलेला, (med.) समधात करणारा, भंजक (R.), दोषशोधक. Correct'ress n. fem. Correct'ness n. तंतोतंतपणा m, ठीकपणा m, दुरुस्तपणा m, यथायोग्यता f. २ शुद्धपणा m, शुद्धि f, विशुद्धि f, शुद्धता f, निर्दोषता f, दोषराहित्य n, दोषहीनता f. Correct'ory a. शुद्धिकारक. N. B. -Correct (ठराविक प्रती-प्रमाणा)शी तंतोतंत-बरोबर करणे. Rectify सुव्यवस्थित करणे. Amend दोष काढून टाकणे. Reform दोष काढून टाकून चिरकाल-निरंतर टिकेल अशी, सुधारणा करणे. - [मुख्य मॅजिस्टेट m. Corregidor (ko-rej'i-dor ) n. स्पेनदेशांतील शहरचा Correlate ( kor'-re-lāt) (L. con, with & Relate.] v. i. to be mutually related ( as father and son) परस्परसबंध होणे-असणे. C. v.t. to put in relation with each other एकमेकांशी संबंध m-नातें n. जोडणे. C. n. correla'tion n परस्परसंबंध m, अन्योन्यापेक्षक संबंध m, परस्परान्वय m, अन्योन्यान्वय m. Correl'ative a. having a reciprocal relation . परस्परसंबंधाचा, अन्योन्यसंबंधाचा, अन्योन्याश्रित, परस्पराश्रित. C. n. परस्पसंबंधी, इतरेतरसंबंधी, जो दुसऱ्याशी निकट संबंध ठेवताे तो. २ gram. सर्वनामाचे तत्पद n, पूर्वगामी पद n. "Correl'atively adv. Correl'ativeness, Correlativ'ity n. परस्परसंबंध m, अन्योन्यसंबंध m, अन्योन्यान्वय m. Correlative term प्रतियोगीपद, सापेक्षपद. Correption (kawr-ep'-shun) [L. correptio, fróm corripere, to seize.] p. (obs.) chiding, reproof वाग्दंड m, शब्दाचा मार m, खरडपट्टी f. Correspond (kor-re-spond') [L. prex. con & Respond.] v.i. (followed by with or to) to be like something in the dimensions and arrangement of its parts (रचनेने किंवा आकाराने) सारखवट असणे. २ ( followed by to ) to be adapted, to suit, to agree, to answer मिळणे, जमणे, जुळणे, जम m-जवा m. &c. बसणे g. of o., जोडी f. बनणे g. of o. recip. ३ ( followed by with ) to have intercourse or communion (esp. through letters) पत्रव्यवहार करणे, कागद पत्राची वहिवाट f. ठेवणे, पत्रे n. pl. येणे जाणे g. of s. recip., पत्रव्यवहार ठेवणे, पत्रोपत्री दळण वळण ठेवणे.