पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/883

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Corn ( kawm ) [ A.S. Curn. cf. L. granum, Sk. जीर्ण.] n. दाणा m. २ धान्य n, दाणागल्ला m, सस्य n. (कणसांत-बोंडांत उत्पन्न होणारी) धान्ये; जसें, गहूं, बाजरी, वगैरे. ३ सर्व प्रकारचे धान्य n. ४ कण m. C. v. t. दाणेदार-रवेदार-रवाळ करणे; as, "To C. gunpowder." २ (च्या) वर मीठ घालणे, खारवणे, मिठांत-मिठाने मळणे; as, "To C. beef." ३ दाणा घालणे-लावणे-देणे-चारणे. ४ colloq. मस्त-छाकटा बनवणें-करणे;as, "Ale C. s him. "Corn-brandy n. धान्यापासून काढलेली ब्रान्डी-दारू f. Corn-beetle n. शेतावर-पिकावर पडणारा रोग m. Corn-bin n. कोथळा m- ळी f, कोठार n, पेटी f, पेंव n, ठिकी f. Corn-cake n. भाकरी f, पोळी f, वगैरे. Corn-chandler n. भुसारी m, गल्लेकरी m, दाणेवाला m, वाणी m. Corn-cob n. कणसाचें बुरखंड n. Corn-cockle n. शेतांत उगवणारे जांभळ्या फुलांचें सुंदर व उंच रानटी गवत n. Corn-crake n. एक प्रकारचा शेतांत सांपडणारा पक्षी m. Corned a. दाणेदार-रवेदार. २ खारवलेले. Corn-country n धान्यमुलूख m. Corn-exchange n. दाणेबाजार. Corn-factor n. धान्याचा घाऊक व्यापारी m. Corn-field n. शेत n, उभे शेत n, भरलेले शेत n. Corn-floor n. खळें n. Corn-flower n. शेतांत उगवणारे एक प्रकारचे गवत n. किंवा असल्या गवताचे निळे फूल. Corn-fly, Corn-moth n. धान्याचा नाश करणारे किडे. Corning-house n. रवेदार दारू तयार करण्याची जागा f. Corn-land n. जिराईत शेत जमीन f. Corn-laws n. आयात धान्यावर कर बसविण्याकरितां इंग्लंडनें (सन १८१५ मध्ये) केलेले कायदे m. pl. हे कायदे सन १८४६ मध्ये रद्द झाले. Corn-loft m. कोठी f, कोठार n. Corn-market n. भुसार पेठ f. Corn-meter m. धान्याचे माप घेणारा सरकारी अधिकारी m. Corn-mill n. भात-धान्य भरडण्याचे यंत्र n, धान्यपेषणी f, गिरण f. Corn-rent n. खंडादाखल ऐन जिन्नस-धान्य देणे. Corn-stone n. तांबडा चुन्याचा दगड m. Corn-van n. धान्य पाखडण्याचें वारवण्याचे यंत्र n. Corn-weev'il n. धान्यास लागणारी कीड f. Corn'y a. धान्यासारखें, धान्यापासून झालेले. २ slang. झिंगलेला, मस्त. There is corn in Egypt there is abundance विपुलतादर्शक-सूचक क्षण. Bare or blank in corn दळा m, दल्हें n, ओसा m. Bundles of unthrashed corn गूड n, उडवें n. Corn just sprung up वाप n. (S.),रूज(झ) वण. Corn soaked and puffed by parching लाह्या, भुरुंगुल्या . Erection over a heap of corn अढी. Grown corn, Sprouted corn रोह, रोप. Head or full ear of corn तटोरी-टटोरी f, पोठरा m, गाभोळी f. New corn नवधान्य, नवाश. To tread out corn मळणें. Whilst you've corn to give out, you will have friends round about असतील शितें तर मिळतील भुतें. Corn (kawan) [L. cornu, a horn.] n. (पायाला-पायाच्या बोटांना) बुटाच्या योगाने पडलेला घट्टा m, जोडयाचा घट्टा m- किणा m. Corn'eous a. bot शृंगसदृश, शृंगासारखा. Corn'y a. शृंगमय, शिंगाचे. Tread on