पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/884

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

one's corn दुसऱ्याच्या मनास लागेल असे करणे, दुसऱ्याचे मन दुखविणे. Cornea (kawa'ne-a) [L. corneus, horny, from cornu, horn.] n. बाहुलीचें ढापण n- पडदा m, तारकापिधान n. २ डोळ्यांत फूल पडणें n. ३ anat. काळे बुबुळ n. Cornea opaca डोळ्यांत फूल पडणे. Cornelian (kawa-ne'-li-un) [L. cornu, horn so called from its horny appearance when broken.] n. min.अकीक m, एक प्रकारचा पाषाण. ह्याचा उपयोग छतासाठी करितात. Also Carnelian. Corneous (kawa'nė-us) (L. curneus, cornu, a horn.] a. शिंगाचा, शृंगरूप. २ bot. कठीण. Corner (kawa'-nėr) [O. F. corniere, cornier, -L. L. cornerium, from cornu, horn, end.) n. कोण m, कोपरा m, कोना m, कोनपडा m, कोनपा m, संधि m, सांद f, अस्त्र (S.) n. [ CHANGING THE C. (AS OF A CAT WITH KITTEN ) कोनपालट m. HOLES AL CORNERS, NOOKS AND RECESSES कोनेकोपरे m. pl सांदी-कोंदी f.pl. IN EVERY HOLE AND C. कोणेकाणी सांदीकोंदी. TO DRIVE UP INTO A C. to stop one's mouth to pose कोंडणे, कोंडमारा m. निरुत्तर m. करणे g of o.] २ secret or remote place गुप्त-आडजागा f, कोनपडा m, एकवसा or एकोसा m. [IN A C. एकोशास, एकोशी THING DONE IN A C. सांदीतली गोष्ट f. To Do GREAT THINGS (MIGHTY FEATS, &c.) IN A C. सुन्या घरी वान देणे, चुलांजवळ शौर्य दाखविणे, गेहेनदित्व.] ३ सांदीकोंदीतला देश m, प्रदेश m; as, “ They explored all corners of the country." ४ दिशा f, बाजू f. ५ गिऱ्हाईकांकडून हवी ती किंमत काढतां येण्याच्या इच्छेने, विवक्षित सहव्यापाऱ्यांनी सर्व किंवा जितका मिळेल तितक्या मालाची एकसट्टयाने खरेदी करण्याने येणारी स्थिति f. C. v. t. कोनांत ठेवणे-ढकलणे. २ संकटांत घालणे. ३ to get command of (a stock, commodity) so as to put one's own price upon it (पुढ़ें हव्या त्या किंमतीला विकता यावा ह्मणून ) सट्टा करणे. Cor'nered a. काेनांत ठेवलेला, &c. २ संकटांत टाकलेला. ३ काेन असलेला, कोनाचा, कोनी (in comp.;as चौकोनी &c.), Corner-stone n. कोपऱ्याचा कोनाचा दगड m, कोन्या दगड m, प्रधानप्रस्तर m, कोना m, कोणशिला f. २ fig. मूलाधार m, प्रधानवस्त f. Corner-tooth n. घोडा चार वर्षांचा असतांना त्याला चार दांत येतात त्यापैकी Corner-teeth pl. Cor'nerwise adv. तिरकस, तिर्यक Cutoff a corner take a short cut मधली किंवा मधून वाट काढणे, जवळच्या रस्त्याने जाणे. Nook and corner कोनाकोपरा-m, सांदीकोंपरा m. Keep a corner थोडीशी जागा राखून ठेवणे, The corner (slang.) Tattersall"s betting rooms in London till (1867) at Hyde Park corner लंडन शहरांतील टाटरसालचा सट्टयाचा बाजार. हा सन १८६७ पर्यंत चालू होता. To make a corner, to combine in order to