पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/839

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिद्धांत m, अनुमान n. ३ (math.) the second term of a ratio (as a:b, here b is consequent & a is antecedent) उत्तरफल n, अग्रेसरपद n. Con'sequen'tial a. परिणामक, आनुषंगिक, अनुवर्ती. २ big, lofty दिमाखदार, दिमाखाचा, पत्रासी or जी, तोरेदार, तोऱ्याचा, मिजांसी, मानी, लब्धप्रतिष्ठित. Con'sequen'tially, Con'sequently adv. त्यामुळे, तस्मात्, ह्मणून, अर्थात्, कार्यकारणभावानें, अतएव, फलतः, अत:कारणात्, दिमाखाने, तोऱ्याने. ३ in a regular series, consecutively नियमाप्रमाणे,अनुक्रमाप्रमाणे, क्रमवार-पूर्वक, &c. Con'sequen'tialness n. (v. A. ) दिमाख m, तोरा m, पत्रास f, मिजाज (स). २ f शेखी f, बढाई f, बढाइकी f. Consequential damage (law) damage so remote as not to be actionable पुष्कळ दिवस झाल्यामुळे ज्याबद्दल दावा लावतां येत नाही असें नुकसान n. २ damage which although remote, is actionable पुष्कळ दिवस होऊन गेले तरी ज्याबद्दल दावा चालू शकतो असें नुकसान n. ३ actionable damage but not following as an immediate result of an act कोणत्याही कृत्याचा प्रत्यक्ष परिणाम नव्हे असे असतांही ज्याबद्दल दावा लावता येतो असे नुकसान n. Conserve ( kon'-serv) [Fr. conserver, from L. con & servare, to keep, to guard. ] v. t. to preserve, to protect रक्षण-संरक्षण करणे. २ to prepare with sugar Sec for the purpose of preservation as fruits, &c. सुरविणे, मुरवून-टिकाऊ-टिकेसा-करणे, पाकवणे, मुरंबा करणे-घालणे. C.n. साखरेंत मुरविलेला पदार्थ m. Conser'vancy n. सांभाळ m, रक्षण n, संरक्षण n. [COURT OF C. तेम्स नदीत मासे मारण्याविषयी प्रतिबंध करण्याचा अधिकार असलेले कोर्ट n.] Conser'vant c. Conserva'tion n. बचाव m, संरक्षण n, पालन n, सांभाळ m. Conserva'tional a. Conser'vatism n. opposition to change पूर्वापार चालत आलेल्या रूढीत-रीतीत फेरबदल न करण्याविषयींचे मत n- विचार m, रूढींत फेरबदल न होऊ देण्याची इच्छा f, रूढिप्रियता f. Conser'vative a. सलामत राखणारा, रक्षक, संरक्षक, पालक. २ स्थितिपालक. C.n. नुकसानापासून बचाव करणारा. २ पुरातन रीतीप्रमाणे वागणारा मनुष्य m.३ (politics.) राजपक्षीय लोक, रूढमार्गवादी, मंदसुधारणावादी, कॉन्सर्व्हेटिव्ह पक्षाचा मनुष्य m, राज्यपद्धतीत एकदम फेरफार नको असें म्हणणाऱ्या पक्षाचा मनुष्य m. Conser'vativeness n. Con'ser'vatoire (kon-ser-va-twär') or Con'servatōʻrium n. संगीत, कला इत्यादि विशेष विषय शिकविण्याची सार्वजनिक जागा f. Con'serva'tor n. संरक्षक m, रक्षक m, पालक m. २ (law.) लोकांत शांतता राखणारा अधिकारी m, न्यायाधीश वगैरे; एखाद्या शहरचे-समाजाचे-मंडळीचे किंवा एखाद्या मालमत्तेचे सर्व हक्क राखण्याचा-कायम ठेवण्याचा ज्याला अधिकार असतो असा राजपुरुष, संरक्षकराजपुरुष m. Conser'vatrix n. fem. Con'serva'torship n. रक्षकाधिकार m. Conser'vatory