पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/840

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. रक्षणवर्धनशाला, विशेष अभ्यासाने गायनादिकलांचे रक्षण करून त्यांचे वर्धन किंवा वृद्धि करण्याकरिता स्थापिलेली शाळा f. २ वनस्पति वगैरे सुरक्षित ठेवण्याचे स्थळ n, रक्षणस्थान n. C. a. रक्षक, संरक्षक. Conser'ver n. Conservation of energy शक्तिसंस्थिति, शक्तीचे प्रकृतिनित्यत्व n. Conservation of matter जडपदार्थाचे नित्यत्व n. Conservative energy प्राकृतिक शक्ति. N. B.-Conservative किंवा रूढिप्रिय लोक मुळीच फेरफार करू इच्छीत नाहीत असें नाहीं; तर रुढीला धरून व अवश्य तितका फेरफार करावा असे ह्यांचे मत असते. Consider ( kon-sid'-ėr) [Fr. considerer, to view attentively, from L. con & sidus, sideris, star; orig. to look at the stars.] v. t. to ponder, to study,to meditate on विचार m. करणे g. of c. चिंतणे; as, "I will C. thy testimonies." २ to examine, to observe तपास m- चिकित्सा f. करणे, न्याहाळून पाहणे;as, "She considereth a field and buyeth it" ३ to have regard to, to respect पाहणे, लक्षिणे, विचारांत घेणे, मनांत-ध्यानांत-लक्षात आणणे, लक्ष n, देणे with कडे of o., जमेस धरणे : as, "C., Sir, the chance of war the day was yours by accident." %; to estimate to view पाहणे, मानणे, भावणे, मोजणे, गणणे, लेखणे, धरणें ; as, Considered as plays, his works are absurd.” ५ to regard with sympathy and pity चिंता करणे, लक्ष्य देणे, चिंता-काळजी वाहणे, परामर्श घेणे; as, “Blessed is he that Considereth the poor." C. v. i. to this seriously, to reflect or medilate on चिंतणे, पूर्ण विचार करणे, चौकशी करणे, विचारांत असणे; as " She wished she had taken à moment to C., before rushing downstairs." Consid'erable a. विचार करायाजोगा, विचारणीय, विचार्य, मननीय, मंतव्य. २ संभावनीय, संभावित, मान्य, योग्य, मान्यतेचा, प्रतिष्ठित. ३ बराचसा, बराच, सांगायाजोगा, जमेस धरायाजोगा, अनुपेक्षणीय, अनुपेक्ष्य; as, "A C. sum of money. Consid'erableness n. Considerably adv. (v.A. 3.) बराच &c. all deci. Consid'erance n. (obs.) (Shakes.) विचार m. Consid'eräte, Consid'erative a. (obs.) विचारवंत, विचारशील, विचारी. Consid'erate'ly adv. विचाराने , विचारपूर्वक, विचारपुरस्सर, सावधानपणाने, सावधपणाने, रीतीने, विचारकरून, बुद्ध्या, समजूनउमजून, जाणूनबुजून. Consid'erate'ness n. विचारीपणा m, विचारशीलता f, विचारदृष्टि f, विचारी स्वभाव m, विचारिता f, विमृश्यकारिता f. Consid'era'tion n.-act. घोळणे n· विचार m, विचारणा f, विभावना f, ऊहापोह m, मनन n, छान f, विमर्श m, चर्चा f. [C. OF PROS AND CONS कार्याकार्यविचार m, फलाफलविचार m, सदसद्विचार m. कर्तव्याकर्तव्यविचार m. MATURE C. पूर्ण-पोक्त विचार m. MINUTE C. सूक्ष्म बारीक विचार m. UPON C. IF WE CONSIDER, &c. पाहिले असता, पाहिल्यार्थी, पाहातां, विचा