पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/815

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परीक्षा करणे, पारख करणे. Condi'tional a. implying terms, depending upon conditions अटीचा, सप्रतिबंधक, 'तरी'चा (?), अन्यावलंबी, यद्यर्थगर्भित. २ gram. संकेतार्थक. C.n. संकेतार्थकशब्द. Conditional'ity n. संकेतार्थकता f, अट असलेली स्थिति f, अन्यावलंबिता f, सोपाधिकता f, सापेक्षत्व n. Conditi'onally adv. अट घालून-सांगून-करून, अटीवर, शर्तीवर, सप्रतिज्ञ. Conti'tionate v. t. (obs.) अट घालणे-ठरविणे. Condi'tioned a. परिस्थितींतला, परिस्थितिविशेषाचा, अमुक एक स्थिति-गुण-धर्म असलेला; as, " A well C. man." २ philo. सोपाधिक, सगुण. Conditioning house n. विणकामाच्या जिनसांची जात f, वजन n-माप वगैरे नक्की ठरविण्याचं घर n, पारखघर n. (हें इंग्लंडमध्ये ब्रेडफर्ड येथे १८९१ त स्थापन झालें). Given conditions. math. प्रतिज्ञा f. Conditional legacy अवलंबी-सोपाधिकमृत्यु-लेखदान n, मृत्युपत्रांतील काही अटीवरची देणगी f. Condole (kon-döl') [L. con, with & dolere, to grieve.] v. i. ( followed by with) to grieve with another ( मृताच्या आप्तांस त्यांचे दुःखांत) सहानुभूति दाखविणे, समदुःखी होणे, परदुःखदुःखित होण, अनुशोचन करणे C. v. t. (R.) (च्या) करितां शोक करणे. Condo'latory a. समदुःखी, दुःख प्रदर्शित करणारा, दुःखप्रदर्शक, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारा, Condole'ment n. Condo'lence n. (v. V.) अनुशोचन n, समदुःखी होणे n, परदुःखेनदुःख n, (मृताच्या आप्तांस) दाखावलेली सहानुभूति f, समदुःखिता f. Condol'ent a. समदु:खी Condo'ler n. अनुशोचक m, दुःखप्रदर्शक m. Condo'ling p. a. (v. V.) दुःख प्रदर्शन करणारा, समदुःखी, दुःखित होणारा. C. vb. n. See the verb. Condone ( kon-don') [ I. condonare, condonatum, to give up, from con & donare, to give. ] v. t. क्षमा करणे, दया करणें, माफ करणे. २ law. विवाहाचे वेळी घेतलेली शपथ मोडल्याबदल पतीने किंवा पत्नीने एकमेकांस माफी करणे. Con'dona'tion n. अपराधदुर्लक्षरूप क्षमा f, माफी करणे n, माफी f, क्षमा f. २ law. नवरा बायकोनी एकमेकांशी केलेल्या बेइमानपणाची माफी f. Conduce (kon-dās' ) [ L. con, together & ducere, to lead. ] v. i. ( with to , to contribute, to help उपोयोगी सहाय-साधक होणे, उपयोगास येणे-पडणे, मदत करणे. C. v.t. ( obs.) वाट दाखवून नेणे, पुढाकार घेणे. Conduce'ment n. (obs). Condu'cible, Condu'cive a. साधक, उपयोगी, उपयुक्त, उपकारक, कारणीभूत, आवह. [C. TO HEALTH आरोग्यावह. C. TO SATISFACTION तृप्तिजनक. ] Condu'cibleness n. आवहता f. Condu'civeness n. (v. A.) आवहकता f, साधकता f, उपयोगीपणा m, उपयोगिता f, उपकारित्व n, उपयुक्तता f. Condu'cibly, Condu'cively adv. Conduct ( kon-dukt') [L. con & ducere, ductum, to lead. ] v. t. to lead, to guide, to escort वाट दाखवून देणे, वाटेने नेणे. २ वाट दाखवून पोहोचविणे, पोहोचविणे.