पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/726

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वयाच्या खोलीतील मलमूत्रपात्र n. Close season-time n. जीवहत्या किंवा मृगया वर्ज्य करण्याचा ऋतु. Closetongued, C- mouthed a. तोलून शब्द बोलणारा, सावधपणाने मागचा पुढचा विचार करून बोलणारा. C. textured a. घनवट, सणसणीत, घट्ट ठासणीचा. C. to the wind वातवाही, ज्या बाजूचा वारा असेल त्या बाजूला हाकारलेलें, अनुवात (जहाज). C. (kloz) v. t. to shut लावणे, झांकणे, मिटणे, ढांपणे; as, To C. one's eyes, To C. the door. २ to conclude, to end संपविणे, उपसंहार करणे, समाप्त करणे, गुंडाळणे, आटोपता घेणे. ३ to unite, to make whole जोडणे, मिळविणे, मिळवून घेणे, मिटणे. ४ ( a quarrel ) मिटवणे, तोडणे, फैसल्ला m. करणे. C. v. i. to come together' लागणे, झांकणे, एकत्र होणे, मिटणे. (esp. of flowers ) मावळणे (at decline of day). २ to conclude संपणे, बंद होणे, आटपणे; as, the debate closed at six o'clock. 3 to coalesce, to unite, to come to भिडणे , मिळवून जाणे. ४ to grow compact and firm दाटणे, जमणे. ५ मिलाफ होणें, कबूल होणे; as, To C. with a person or with terms. ६ (in wrestling) भिडणे, लगटणे. Closed pa. t. & p. p. Closing pr. p. v. n. झाेंबी f, कुस्ती f. २ mus. उतरता स्वर m, स्वरपात m. ३ बंद करणे, सांधा m. ४ अंत n, समाप्ति f, शेवट m. Clos'er बंद करणारा मनुष्य m. Clos'ing a. last, final समाप्तीचा, अखेरीचा, शेवटचा, सरता. Clos'ure n. बंद करणे. २ obs. अंत m, शेवट m. ३ वाडा m, भिंत f. ४ 'हाऊस ऑफ कॉमन्स' मध्ये हजर असलेल्या सभासदांची मते घेऊन भांडण मिटवणे. Close of the day दिवसावसान, सांज f, संध्याकाळ f. To C. on or upon एकमत होणे. To C. a. bargain साटें n, सौदा m. ठोकणे. To C. with हातघाईवर येणे. २ मान्य करणे, मंजूर करणे. ३ करार करणे. To C. with the land किनान्याजवळ येणे. To C. one's eyes डोळे मिटणे. To C. one's lips धिमे धिमे बोलणे. २ मुख बंद ठेवणे. Closet (kloz'et ) [O. F. closet, a little enclosure, dim. of clos.] n. खलबतखाना m, एकांताची खोली f, एकांतस्थान n, मंत्रागार n. २ स्वयंपाकाची भांडी, जिन्नस, वगैरे ठेवण्याची जागा. ३ बळद n, कोनाडा m. C. V. t. एकांतांत खलबत n-मसलत f करणे. २ छपविणे. To be closeted (with), to have private consultation (with) खलबत करणे, सल्ला मसलत घेणे. Closh (klosh) [F. clocher', to limp or halt.] n. गुरांच्या मानेवर होणारा एक जातीचा रोग m, खूत n; also खत, Corruption of क्षत. २ (obs.) एक जातीचा खेळ. Clot ( klot) [O. E. clodde, a clod of earth. ] n. a. concretion or coagulation गुठळी (रक्ताची वगैरे). २ गोळा m, संघटन n, f. ३ a clotted mass गट m, लगट f, ढिपळ n. C.v.i. to form into clots, गोठणे, बोळणे, आटणे, सांखळणे. २ चिकटणे, डकणे. ३ (गोठून) जाड होणे. C. v. t. गुठळी f. करणे, गोळा करणे.