पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/725

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येणारा (पेटका), आंतरिक (उद्वेष्टन). Clonus-ankle पायाच्या घोट्याजवळ येणारा पेटका. Clopp (kloop) [ An onomatopoctic word. ] n. the sound made when a cork is forcibly drawn from a bottle बाटलीतून बूच जोराने काढतांना होणारा आवाज, फट् आवाज m. Close (klos) [O. F. & F. clos, p. p. of clore, to close, from L. claudere, clausum, to close. ] a. compar. Closer, super Closest, shut fast घट्ट,गच्च-आवळ-बसलेला लावलेला. २ dense, solid घट्ट, सांद्र. ३ दाट, घनदाट. ४ contiguous लागूनच, जवळचा, निकटस्थ, समीपचा. ५ सलगीचा, जिवलग, जिव्हाळ्याचा; as, A C. friend. ६ of close texture घट्ट ठासणीचा, दडस, सणसणट, सणसणीत. ७ reserved, uncommunicative फार न बोलणारा, अल्पभाषी. ८ Said of the air, weather, &c. oppressive, sultry उबट, उबाळ्याचा, उकाड्याचा, गुदमरण्याचा, कोंडमाऱ्याचा. [TO BE C. imper's, उबावणे, उकडणे. To FEEL IT TO BE C. उबगणे(?), उबणे, डगडगणे. ९ without ventilation उबट, कोंडमाऱ्याचा. १० private, concealed गुप्त, झांकलेला, दाबलेला; as, Her C. intent. ११ penurious चिकट, चिंवट, चिकण (?), चिकु. १२ strictly adhering to the original हुबेहूब, यथासूल, थेटमुळासारखा, मुळाबरहुकुम, अक्षरशः. १३ (of translations) मूळअर्थानुसारी, यथामूल; as, A C. translation. १४ अरुंद; as, A C. alley. १५ लक्ष्यपूर्वक अश्लथ-बंदोबस्ताने ठेविलेला-राखलेला; as, A C. prisoner. १६ संक्षिप्त, मुद्देशीर, आटोपसर. १७ आंखूड, तोकडा; as, to cut grass or hair C. १८ दुष्प्राप्य, दुर्लभ; as, Money is C. १९ सावध, अचूक, बारीक, काळजीचा सूक्ष्म. २० एकाग्र, एकलक्षी, अस्खलित; as, A close observation. C. adv. see Closely. C. n. conclusion, cessation अंत m, समाप्ति f, शेवट m, अखेरी f. २ an enclosed. piece of meadow or field वाडगे n, वखळ, वाढी f, परडे n, परसू n. ३ अरुंद रस्ता m. ४ क्याथेडलच्या आवाराची हद्द f. C. attention सावधानचित्त. C. banded a. अश्लथ, गच्च, घट्ट, अडच, बळकट. C. barred a. घट्ट, गच्च. C. bodied a अंगाबरोबर बसेल असा (कोट). C. corporation आपल्यांतील खाली झालेल्या जागा आपल्यांतच भरणारी मंडळी. C. fisted, -handed a. कृपण, कद्रू, चिकट, लोभी, चिक्कू, कंजूष. C. grained a. दाट, जवळजवळ परमाणु असलेला, दृढसंधि (with the fibres ). Closely adv. crowdedly गच्च, खच्च, अडच. २ दाट, लगत. ३ पाठोपाठ, मागोमाग. ४ एकचित्ताने, मन लावून, लक्ष्य देऊन, Close'ness n. घट्टपणा m, घट्टाई f, घनता m. २ निकटता f, समीपता f, जवळपणा m. ३ घनवटपणा, सांद्रता. ४ खोलपणा, संकोच m. ५ उबारा m, उकाडा m, गर्मा m. ६ चिकटपणा m, बारीक दृष्टी f, किरटेपणा m. ७ कोंडलेली हवा f, उबटपणा m. Close-stool n. निजा