पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/688

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Chump (chump) n. [ An imitative word expressive of the thick end of anything. ] n. ठोकळा m, ठिकी f, ओंडा m. & the but-end of anything, called also chump-end जड बुडखा m; as, The chump of loin of mutton. ३ (jocosely applied to the head) डोकें. [OFF' HIS CHUMP adv. phrase, off his head देहभानावर नसतांना.] ४ मठ्ठ m, टोणपा m. Chump chop n. बुडाच्या जवळचा तुकडा m. Chunam (chuna'm) [Hindi. चुना, from Sk.चूर्ण, lime.] चुना m, सुधा (S). Terrace or floor of C. or C. works चुनेगच्ची f. Making of a C. floor गचिगिरी f. of C. work चुनेगच्चीचा. Church ( church) [O E. chirche, cherche.--A. S. circe, cyrice, (the c's all hard), form Gr. kyriakon, the Lord's house, from kyris the Lord] n. a building set apart christian worship सार्वजनिक खिस्ती देवालय n. (चापल किंवा आरेटरी नव्हे. चापल किंवा आरेटरी हा खासगी उपासनामंदिरे आहेत.), चर्च n. 2 a body of believers, church as the community or whole body of Christ's faithful people collectively एक्क्लेसिया, ख्रिस्ती समाज m. [Church militant-the church on earth considered as warring against the powers of evil पापप्रतिकारी एकक्लेसिया, पापविरोधक एकक्लेसिया, शी झगडणारा युद्ध करणारा खिस्ती समाज m. triumphant, the portion of the church which has over-come the world and entered into glory (स्वर्गातील विजयी एकक्लेसिया, जितपाप एकक्लेसिया, नष्टपाए एकक्लेसिया, पापजित् एक्क्लेसिया, पापावर जय मिळविलेला ख्रिस्तसमाज m, पापाचा नाश करून शाश्वत सुखाचा आस्वाद घेणारा ख्रिस्ती समाज m. Visible Church the church as visibly consisting of its professed members upon earth. पृथ्वीवरील दृश्य Invisible or mystical Church अदृश्य एकक्लेसिया Church universal or catholic काथोलिक-सार्वत्रिक एक्क्लेसिया.] ३ खिस्ती धर्मशाखा f; as, The primitive Church, the Latin Church, the Greek the Orthodox Church, the Gallican Church, Nestorian Church, &c. &c. [The High church प्राचीन काळची धर्ममतें व रीतभात यांजकडे लक्ष इंग्लंडांतील एकक्लेसियेचे लोक. The Low Church सोळाव्या शतकांतील प्राटेस्टंट धर्मसुधारकांच्या मतांकडे लक्ष देणारे इंग्लंडांतील एक्क्लेसियेचे लोक. The Board Church प्राचीन ख्रिस्ती धर्माच्या रीतीभातीकडे विशेष लक्ष्य न देणारे इंग्लंडांतील एकूक्लेसियेचे लोक. The established Church (राज) संमत एकक्लेसिया मंजूर एकक्लेसिया. 4 a congregation of locals Christians ख्रिस्ती मंडळी f. [Church court ख्रिस्ती धर्मासंबंधी खटल्याचा निवाडा लावणारें कोर्ट n.] Church v.t. (उपकार स्तुति करण्यास) प्रसूतिसंकटांतून पार पडल्यानंतर् देवळात जाणे, लग्नानंतर-बाळंतपणानंतर देवळांत जाणे. Church-