पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/675

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लहान पक्षी m. २ चिवचिव करणारा m. Chirping a. उल्हासी, आनंदी. C. n. चिणचिण f, चिवचिंव f, चिची f. Chirping-cup n. उल्हास वाढविणारे पेय (पेलाभर). Chirp'y a. आनंदी. Chirrup (chir'up ) v. i. चिंवचिंव करणे. Chirrup v. t. तोंडाने चकचक आवाज करून घोडा हाकलणे. २.fig. हुशारी-उत्तेजन देणे, उत्साह वाढविणे. Chirurgeon Chirurgery, Chirurgical, old forms of Surgeon, Surgery, Surgical शस्त्रवैद्य, शस्त्रविद्या, शस्त्रवैद्यका-संबंधी. Chirur'geonly adv. (obs.) Chisel (chiz'el) [O. Fr. cisel.-L. L. cisellus, probably for caesellus, from L. ccesus, pa. p. of ccedere, to cut.] n. (of a carpenter) किंकरें n, विंधणे, पातळी f, [SMITH'S C. छिनी f. STONE CUTTER'S C. टांकी f, टंक m, पाषाणदारक m. INCISION MADE WITH IT टांकी f. ONE WHO WORKS WITH IT टांकेकरी m.] २ छिनी (लोखंड) दगड फोडावयाची. C. v. t. किंकऱ्याने-विंधण्यानें-&c. कापणे-तोडणे, छिनीने कापणे. २ (stone) to roughen with incisions टांक्या पाडणें-मारणे, टांकी f. लावणे. ३ फसविणे (slang). Chis'elling pr. p. Chis'elled pa. p. Chis'elled a. विंधण्याने कापलेलें, तासीव, टांकी लावलेले. Chis'elling n. Chis'elshaped. a. Chis'eltooth n. खार, उंदीर इत्यादि प्राण्यांचा वेधकदंत (incisor). Cold chisel थंड धातु कापण्याची छिनी f. Chit (chit) (Hind. chitti.] n. a note or small epistle चिट्टी (ठ्ठी) f, also Chitty चिटी f. Chitee, Chitti. Chit (chit) [A. S. cian, to germinate.] n. (generally used in contempt of young persons ; now mostly of a girl or young woman.) मूल n, पोर n, चिटलिंग n, चिटू m. २ कोंब m, अंकुर m, मोड m. ३ (obs.) चामखीळ m (शरिराच्या काही भागावर आलेला). C. v.i. अंकुर फुटणे. Chit'ty a. पुष्कळ अंकुराचा, अंकुरमय. Chit-chat (chit'-chat) n. गप्पा, बाता, बाष्कळ भाषा f, बोली-बोलणे.

Chitin (kitin) [Gr. chiton, a coat of mail.] n. लहान लहान किड्यांच्या बहिर्त्वचेतील एक पांढरा कठीण भाग m, बहिस्त्वचेतील कठीण श्वेतद्रव्य. Chitterling (chit'er-ling) n. डुकराच्या पोटांतील लहान आंतडे. २ डुकराच्या आंतड्याचे भाजून किंवा शिजवून केलेले पक्कान्न n.

Chivalry (shiv'al-ri) [O. Fr. chevalerie, Fr. cheval.-L. caballus, a horse. इंग्लंडांत पंधराव्या शतकांत पीडितांचे रक्षण हेच ज्यांचे ब्रीद अशा नाइट (knight) लोकांच्या अमदानीत Chivalry ह्याचा अर्थ "युद्धास सज अशी अश्वसेना" असा होता. इंग्रजी ग्रंथांत Chivalry ची जी निरनिराळी वर्णनं दिली आहेत त्यांवरून इंग्लंडांतील मध्ययुगीन कालांतील नाइट लोकांत व हिंदुस्थानांतील प्राचीन क्षत्रियांत फारच साम्य आहे. गीतेंतील क्षत्रिय धर्माचे लक्षण पुढे दिले आहे. "शौर्य तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् । दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् " 'आर्तत्राणाय (for the defence of the op.