पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/629

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 विधिसंबंधी, संस्कारासंबंधी, वैधिक, विधीचा, कर्मात्मक. 2 विशेषविधिदर्शक; as, The C. costume. ३ विधिरूप, क्रियारूप, कर्मरूप. ४ आदराेपचारासंबंधी, शिष्टाचारासंबंधी; as, " Laying on one side all C. manners." Ceremo’nial n. a prescribed system of Ceremonies विधिपद्धति, विधिक्रम n; as, The C. prescribed in the Anglican service. २ (R.) विधि m; as, The use of water is not it mere empty C. ३ शिष्टाचार m, शिष्टांशी किंवा वडिलांशी वागण्याचा वर्तनकम m. ४ (of Romen Castholic church ) विधिपुस्तक n; as, “The Roman Ceremonial was first published by the bishop of Corcyra in 1506." Ceremonialisin n. बाह्याचारसंसक्ति f, शुष्कविधिप्रीति f, विधींवर विशेष भर m, दांभिकपणा m. Ceremonialist n. बाह्यविधींना पुष्कळ महत्व देणारा, विधिवादी, तांत्रिक. Ceremonially adv. Ceremonious a. पुष्कळ विधींचा, विधियुक्ता, ज्यासाठी पुष्कळ विधी करावें लागतात असा. २ दांभिक, बाह्यविधींचा. ३ (ठराविक) शिष्टाचारानुरूप: as, C. politeness. 8 (of persons ) विधि m- संस्कार m- कर्म n. ही अतिशय पाळणारा, मंत्रापेक्षा तंत्राकडे जास्त लक्ष देणारा, तांत्रिक. ५ आदरोपचारी, आदरशील. Ceremoniously adv. विधीने, आदरोपचारी , यथाविधि, यथोपचार. Ceremoniousness n. विधीचा कचाइनीपणा m, आदरोपचारनिष्ठा f, आदरोपचाराची भक्ति f. To stand on ceremony संकोचाने वागणे, उपचारांच्या कवाइतीकरिता अडून बसणे, तांत्रिक उपचारांची वाट न राहणे. Not to stand on ceremony घरोब्याने वागणे. Without ceremony off hand, unceremoniously विशेष उपचारांच्या कवाइतीची वाट न पाहतां. Master of ceremony, The person who superintends the ceremonies observed in place of state or on some public occasion राजसभानियमाभिज्ञ, राजसभानियमपटु m. बडोदं संस्थानांत Master of ceremonies याला गोठगस्ते असे म्हणतात. राजसंभेत ह्याला खाली दिलेली कामें करावी लागतात; (१) ज्या वेळी दरबार होती त्या त्या वेळी मंडळीस आमंत्रण करणे. (२) दरबारांत नेमलेल्या ठिकाणी बसवणे. (३) पानसुपारी देणे.] N. B.--Ceremony शब्दाचे (१) कर्म, (२) शिष्टाचार, (३) समारंभ हे मूळ अर्थ आहेत. इंग्लंडांतील एकक्लेसिएच्या रीत्यनुसार साधारण प्रार्थनेच्या पुस्तकांत, विधि = rite, आणि कर्म = ceremony असे अर्थ खिरती बिशपांच्या सभेने ठरविले आहेत. Ceres ( sēʻrēz) [L. Ceres, the daughter of Saturn & Ops or Rhea, the goddess of corn & tillage.] n. सीरीझ नांवाची कार्षदेवता,. ग्रीक लोकांची धान्य व कृषीकर्म ह्यांवरची अधिष्ठात्री देवता f, रोमन लोक हिला डेमेटर म्हणतात. २ astron. मंगळ व बृहस्पति यांच्या कक्षेतील एक लहान तारा m.

Careus ( sēʻri-us) (L. cera, wax.] n. सिरीअस नावाचे अमेरिकेत वाढणारे एक जातीचे झाड n, याला पानांऐवजी कांटेच येतात, कंटकपर्णवृक्ष m.