पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/579

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Silique, इत्यादि फळांच्या जातींना आमचे पारिभाषिक शब्द आम्ही Fruit शब्दाखाली देणार आहोत. Captain (kap'tan) [O. Ę. capitain, captain.-Fr. capitaine.-L. L. capitanus, from L. caput, the head.] n. a chief officer नाईक m, प्रमुख, नेता, सेनाधिकारी m, सरदार m, (चेंडू वगैरे खेळणाच्या मंडळीचा) नाईक m, कप्तान m. २ (of a ship) कप्तान m, नाखवा m, तांडेल m, नौकाध्यक्ष m, नौकाधिपति m. ३ (of a band, gang, &c.) नायक pop. नाईक m, नायकडा m, नायकवडा, म्होरक्या m. ४ (of a body)-as, of spearmen, couriers, peons, labourers, &c. नाईक, हवालदार, जमादार, मिरधा, मुकादम. ५ the commander of a company in a regiment कप्तान. ६ one skilled in war युद्धकुशल, योद्धा m. ७ वर्गाचा कप्तान, शाळेतील वर्गाची व्यवस्था ठेवणारा मुलगा m. C. a. (R) श्रेष्ठप्रतीचा-धैर्याचा. C. v. t. पुढाकार-पुढार घेणे. Captaincy, Captainship n. नाइकी, नायकवडी, पुढारकी, कप्तानी f, सरदारी f, सरदारकी f, आधिपत्य n, स्वामित्व n. २ कप्तानाची जागा f-पदवी f, नौकाधिपतीची पदवी f, कप्तानी f. ३ युद्धकौशल्य n. Captain general n. सैन्याचा मुख्य m, सरनाईक m. Caption ( kap'shun) [L. captio, a taking, a sophistical argument, from capere, to take.] n. (obs) धरणे. २ (R.) युक्तीने पकडणें n. ३ (भांडण उकरून काढण्याच्या हेतूने) तकरार करणे n. Captious a. censorious, cavilling, carping, given to cavil दोषकदृष्टीचा, निंदक, दूषक, तकरारी, आडफांट्या. २ futted to harass or perplex, invidious, troublesome पकडीचा ,धरपकडीचा, पेंचबांधाचा. ३ proceeding from a cavilling disposition दोषदृष्टीपासून उत्पन्न होणारा, दोषकदृष्टीचा, दिक्कतखोरीचा, हुजतखोरीचा, आडफांटयांचा. Captiously adv. (v. A.) दिक्कतखोरीनं, तकरारीने , आडफांटे फोडून, &c. Captiousness n. (V. A. 1.) दोषदृष्टिस्वभाव m, दिक्कतखोरी f, हुजतखोरी f, तकरारखाेरी f, निंदकता f, पेंच m. (used as an abstract noun.) Captivate ( kap'tiv-āt) [L. captivatus p. p. captivare, to capture, from captivus, captive.] ”.v. t. to take prisoner (obs.) युद्धांत पकडणें-धरणें-पाडाव करणे. २ to fascinate, to enchant.मोहून वश करणे, मोहणे, भारणे, मोह m- मोहनी f- घालणे, मोहित करने, as Cleopatra captivated Antony. Captivating a charming, engaging, pleasing मोहक, वश करणारा, मोहित करणारा, मनो(न)मोहक, मनोवेधक; as, C. smiles, manners, &c. Cap'tivation n. (R.) मोहन n, मोहित करणे n; as, The C. of our understanding.

Captive (kap'tiv) [L. captivus, from capers take.] n. लढाईतला कैदी m, यद्धदास m. २ प्रेमपाशबद्ध. ३ सौंदर्याने लोभित झालेला. C. a. युद्धांत धरलेला, पाडाव केलेला, युद्धधृत , युद्धगृहीत. २ मोहित झालेला, ३ बंधनकारक, कैदखान्यासंबंधी: as, C. chains बंदीवासाचा; as, C. hours. C.v.t. to take prisoner, to