पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माला f. Beadsman, Beadsman n. पैसे घेऊन प्रार्थना करणारा. एखाद्या इसमास न फावल्यास तो आपल्याकरितां पैसे देऊन प्रार्थना करावयास जो मनुष्य लावतो तो, जपकरी m, जप्या m, अनुष्ठानी, जपाचा ब्राह्मण m. Bead-plane n. गोलरंधा m. Bends woman n. दुसऱ्याकरितां जप करणारी बायको f, अनुष्ठानी बायको f.
 N. B.-मणका हा शब्द मणि ह्या अर्थी फारच कचित् वापरतात. करमरामणि करमरें या फळासारखा असतो.
Beadle ( bed'l) [ A. S. beodan, to proclaim.] n. छडीदार m, पाईक or पायक m (His office पायकी f.), भालदार m, अदालतींतील चोपदार m, पक्षकार व साक्षी यांची नांवें पुकारणारा शिपाई m, नाझराचा शिपाई m. २ ख्रिस्ती देवळांतील शिपायासारखा अधिकारी m. ३ विद्याधिकारी व विद्यार्थी यांचे मिरवणुकीत आधी चालणारा, विश्वविद्यालयाचा चोपदार m. Beadledom, Bead'lehood n. Bead'leship n. Bea'dlery n. चोपदारी m, पायकी m.
Beagle ( bē'gl) [Origin unknown. Dr. Murray suggests Fr. begaenle.] n. एकजातीचा लहान शिकारी कुत्रा m. २.fig. गुप्तपोलीस m. ३ बेलीफ m.
Beak (bek) [ Fr. bec.] n. bill चोंच f, टोंच f, चोंचेसारखें टोंक n, बोंच f, चंचु f, चंचुपुट n, जमिनीची चोंच f. २ naut. जहाजाचा नाळेकडील अणीदार भाग m, चेंचेसारखी नाळ f. ३ चोंचेसारखी वस्तू f. ४ (कांहीं प्राण्यांचें व सरपटणाच्या प्राण्यांचें) चोंचेसारखें तोंड n, चंचुमुक n. ५ चोंचेसारखें नाक n. Beaked a. चोंचीसारखा, चंच्वाकार, चोंच असलेला. Beak-like projection pathol. चोचीसारखा उंचवटा m-पुढे आलेला भाग m.
Beaker ( béker) [Gr. billos, in wine-jar.] n. (रांजणासारखा) पिण्याचा मोठा पेला m, पडघीचा पेला m. २ पेलाभर पदार्थ m. ३ आंखलेला-आंखी पेला m. ह्यावर मामाच्या खुणा असतात.
Beam (bēm ) ( A. S. beam, a beam, a post, a tree, a ray of light. Gr. phyma, it growth.] n. a piece of timber तुळई, तुळवट , बहाल, दांडी, सर m, सरी f, बार n. [B. OVER TWO POSTS. piece B. खांडतळई f, खांड n. LONGITUDINAL DIVISION OF A B. चिरखांब (ड) m. SHALL AND SQUARED B. कडी f, बडोद m.]. २(of balance) दांडी f. ३ (of a car, &c.) दांडी f, गाडीच्या दोन घोड्यांच्या मधला दांडा m, धुराणी f, धुरांडी (unly.).४ (of the weaver) तुरी/. ५ ( of the sun) किरण m, रश्मि m, कर m. [SHORN OF HIS BEANS क्षततेजा, क्षततेजस्का . ७ (of a draw-well)-transverse, with stone ओकती f, लाट f (पाणी ओढण्याचा मोटेची). ७ (of a stag) सांबराची शिंगे ज्या मुख्य सुळक्यापासून फुट नात तो शिंगाचा सुळका m. ८ जहाजाची रुंदी f.; as. "One vessel is said to lave more beam than an other." ९ ससाणा पक्ष्यांच्या पंखांतील मोठे पीस n. OL the B. नावेच्या कण्याशी समांतर. The weather B जहाजाची वाताभिमुख बाजू, जहाजाची जी वाजू वाऱ्या