पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1992

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम्या, जडणारा, जड्या . Inlaying pr. p. & v. n. जडणें n, जडण n, जडणी f, जडणकाम n.
Inlet (in'let ) [ E. in & Let. ] n. a passage by which one is let in, place of ingress, entrance आंत जाण्याचा रस्ता m, वाट f. २ a bay खाडी f, वांकण n, मोहर m. ३ an inserted material आंत बसवलेली वस्तु f.
Inly (in'li ) [ A. S. inlic-in, & lic, like. ) a. inward, आंतला, आंतील, अंतस्थ, गुप्त, अंतर्यामींचा, पोटांतला. I. adv. secretly गुप्तपणाने.
Inmate (in'dāt) (In, & Mate.] n. one who is in the same house with another, a fellow-lodger एकाच घरांत राहणारा, सहवासी, सहस्थायी, सहनिवासी, एकस्थलस्थ. २ ong received into a hospital इस्पितळांत (उपचाराकरितां) घेतलेला रोगी m.
Inmost ( in'most ) a. See Innermost under Inner, Inn (in) [ A. S. in, inn, an inn, house -in, inn, within, from the prep. in. Icel. inn, house. या शब्दाचा मूळ अर्थ 'राहण्याची जागा, निवासस्थान, घर.' असा होता. ] n. a house for the lodging and entertainment of travelers फिरस्त्या लोकांच्या राहण्याची व जेवणाखाण्याची सोय करण्याचें घर n, खाणावळ, उतारशाळा, उतारवाडा m, भटारखाना m, पथिकाश्रम m, धर्मशाळा , सराई f. २ a college in London for students of law and barristers लंडनांतील कायद्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राहण्याचे कॉलेज n, कायद्याचे विद्यालय n, स्मृतिशास्त्रज्ञवास m; as, "Inns of court." ३ दारूचे दुकान n, पानस्थान n. I. V. i. to lodge राहणे, वास करणे. I. v. t. to shelter. आश्रय m -थारा m. देणे. २to afford lodging and entertainment to (च्या) उतरण्याची व जेवणाखाणाची सोय करणे. Inn'-keeper, I.-holder n. खाणावळवाला, भटाया, भटारी.
Innate ( in'ät, in-nāt') [ L. innatus -in, in, & nasci, to be born. ] a. inborn, inherent, natural जन्माचा, आंगचा, जातीचा, जन्मतः आंगी असलेला, स्वाभाविक pop. स्वाभाविक, स्वभावसिद्ध, स्वभावज, सहज, नैसर्गिक, निसर्गजात, प्रकृतिस्थ, अंतर्जात. २ metaph. derived from the constitution of the intellect ( as oppo. to acquired from experience) आंगच्या बुद्धीचा, स्वतःच्या अकलेचा. ३ bot. joined by a base to the very top of the filament अधःस्पर्शी, बुडापासून टोकापर्यंत जोडलेला; as. I. anthers. Innateness n. सहजत्व m, स्वभावसिद्धत्व n, नैसर्गिकत्व n, &c. Innately adv.
Innavigable (in-nav'i-ga-bl) a. impassable by ships or resells नौकागमनाशक्य, अनाव्य, ज्यामधून नौकाप्रवास करता येत नाही असा (समुद्र, खाडी, नदी). Inner (in'er) [compar. of in.) a. interior, internal आंतला, आंतील, आंतर,आतल्या बाजूचा -आंगचा कडेचा. [ I. ORGAN अंतःकरण 2. I. SELF अंतरात्मा m.] २ obscure, not easily discovered अंतस्थ, अंतस्थित, गर्भस्थ, मांतर, गूल, गान, सहज न समजणारा