पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1924

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Impassioned (im-pash'und) [L. in, intensive, & Passioned.] a. showing warmth of feeling, ardent, excited प्रवलमनोविकारान्वित, प्रबलमनोविकारयुक्त.
Impatience (im-pa'shuns) [L. in, not, and Patience.]n. want of patience, fretfulness; restlessness (a) असहनशीलताf, असहनशीलपणा m, असहिष्णुताf, असोशिकपणा m, अधीर m, अधैर्यn, अक्षमताf. (b) ( hence) अधीरपणा m, अधीराईf, उतावळ f,औत्सुक्यn , उत्कंठा f, हुटहूट f, खूरखूरf, खवखवf, विलंबासहन n, हुळहळf. Impatient a. not able to endure • असोशिक, असहनशील, असहिष्णु, अधीर, अक्षम, असह, अधिन्या, धैर्यहीन. २ ( hence ) not able to wait उतावळा, दम न धरणारा, वाट न पाहणारा, उत्सुक, सोत्कंठ, सोत्कंठित, हवळा, हुडहुड्या, हुळहुळ्या. ३. उतावळीचा, धांदलीचा; as, "An I. speech or reply". Impatiently adv.असहिष्णुतेने, अधीरपणाने,अधैर्यपूर्वक. २ उतावळीने, उत्सुकतेने, उत्कंठेनें.
Impawn (im-pawn') [L. in, intensive, and Pawn.] v.t. to pawn or deposit as security तारण गहाण लावणे.
Impeach (im.pēch') [ Lit. 'to hinder', Fr. empêcher;either from L. impingere, to strike against, or inpedicare, to fetter. See. Impinge. Impeach याचा मूळ अर्थ 'अडथळा -हरकत अडचण करणे' असा होता.]v.t. to charge with a crime, to accuse, to cite before a tribunal for judgment of official misconduct (said esp. of a public officer ) सार्वजनिक रीतीने दोषारोप करणें with वर of o.(ला) दोष लावणे,(गैरवर्तनाबद्दल) न्यायासनासमोर आणणे, तोहमत ठेवून (सरकारी कामगाराची) न्यायासनापुढे चौकशी करविणे. २ ( hence) to charge with impropriety, to call in question ('च्या सद्वर्तनाबद्दल किंवा सद्धेतूबद्दल) संशय घेणे येणे in. con. with ला of B., (वर) आक्षेप -शंका काढणे, (च्या संबंधाने) साशंक असणे, तकरार करणे, दोषाई समजणे; 8s, "To I. one's motives or conduct." ३ (law) to discredit the credibility of a witness or the validity of a paper &c.(साक्षीदाराच्या बोलण्यावर किंवा कागदपत्रांच्या खरेपणावर) विश्वास न ठेवणे, खरें न समजणे, खोटें आहे असें मानन चालणें. Impeachable a. दोषाई, दोषारोपास पात्र. Impeacher n. Impeachment n. (सरकारी कामगारावर दोषारोप करून त्यास) चौकशीसाठी न्यायासनासमोर आणणें n, (एखाद्या सार्वजनिक स्वरूपाच्या मोठ्या गुन्ह्याबद्दल) तोहमत -दोष ठेवणे, आरोप करणे n. २ शंकाf, आशंकाf, (दुसन्याच्या सद्धेतूबद्दल मनात आलेला ) संशय m, तकरारf.
Impearl (im-perl') [ L. in, in, and Pearl. ) v. t. ( Poetic ) to form into pearls (ला) मोत्यांसारखे रूप देणे, मोत्यांप्रमाणे करणे बनवणे; as, "Dewdrops which the sun impearls on every leaf". २ to adori. as with pearls (मोती घातल्याप्रमाणे ) सजविणे श्रृंगारणे; as, "The morning dews I, every thorn".