पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1827

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आनुवंशिक, मुलांत उतरणारा (गुण इ०). Hereditability n. वंशपरंपराप्राप्यता. Hereditable a. वारशाने मिळणारा. Hereditably adv. वंशपरंपरेनें. Hereditament n. (law) वंशपरंपराप्राप्य मिळकत f, वारशाने मिळणारी मिळकत. Hereditarily adv. वंशपरंपरेनें. Heredity n. आनुवंशिकताf, वंशपरंपराप्राप्तताf, पिढीजादपणा m. Heritable a. (of things) वंशोपभोग्य, वंशोवंश वंशपरंपरा चालणारा. [H. RIGHTS वारसपणाचे हक m. pl.] २ (of persons) रिक्थहारी, वारसा सांगणारा. Heritably adv. Heritage n. वारसा m, वतनn. २ Script. the Israelites or the chosen people of God (ईश्वराचे आवडते) इस्रायल लोक m. pl. Heritance n. वतनn.
Heresy (here-si) [ Fr. heresie -L- heeresis -Gr. hairesis -hairein, to take.]n. an opinion adopted in opposition to the usual belief (usually, but not necessarily, said in reproach) (प्रचलित धर्म किंवा रूहि यांच्या) विरुद्धमतn , पाखंडमतn , पाषंडमार्ग m. २ ( theol. ) प्रचलितधर्मविरुद्ध मतn, विशिष्ट समाजास मान्य असलेल्या धर्मतत्त्वांचे विरुद्ध मत n, थोतांडn .३ (Law) an offence against Christianity ख्रिस्ती धर्मस्त्राच्या विरुद्ध आग्रहाने व उघड उघड प्रतिपादन केलेले मतn , खिस्तधर्मविरुद्ध मतn. Heretic a. पाखंडी. २ प्रचलित धर्मतत्वांविरुद्ध वागणारा,('मुरारेः तृतीयः पन्थाः' या न्यायाने धर्मभेद उत्पन करणारा) पाखंडी. ३ ( Rom. Cath.) एकदा ख्रिस्ती धर्म पतकरल्यावर पुन्हां त्यांतील काही तरवांविरुद्ध मुद्दाम आग्रहाने वागणारा (मनुष्य). Heretic a. पाखंडी, थोतांडमताचा, थोतांच्या. Heretical a. Heretically adv. Hereticate v. t. to denounce as a heretic पाखंडी म्हणून सोडून देणे.
hermaphrodite ( her-mafrod-It ) (L. -Gr. Herma phroditos, the son of Hermes and Aphrodite, who, when bathing, grew together with the nymph Salmacis into one person.]n. an abnormal individual in whom are united the properties of both sexes (-male) (जन्माचा) हिजडाm, ठवा m; (-female) हिजसीf, अर्धनार f; संशयितलिंगी स्त्री किंवा पुरुष, हिजडे n. २an animal or plant in which the two sexes are united द्विलिंगी प्राणीm, द्विलिंगी वनस्पतिf, स्त्रीनरकेशरयुक्त पुष्पn , युग्मलिंगी पुष्प n. H. a. संशयितलिंगी, उभयलिंगी, स्त्रीपुरुषजातीचा. Hermaphro dit'ic,-al a. हिजडा . Hermaph'rodism n.हिजडेपणा m, संशयितलिंगिरवn.
Hermeneutics (hér-me-nū'tiks) [Gr, hermeneutikos •hermeneus, an interpreter -Hermes, Mercury, the god of art and eloquence.] n. the science of interpretation and explanation (esp. of the Scriptures) श्रुतिशब्दार्थमीमांसा f, अर्थप्रकाशन N. Hermeneutic-al a. explanatory, exegetical विवेचनात्मक, विवरणात्मक, श्रुतिशब्दार्थमीमांसेसंबंधी. Hermeneutically adv.विवेचनरूपाने, विवरणरीत्या.
Hermes (her'-mēz) [Gr. Hermes Trismegistos, lit.