पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1820

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

which a ship 28 steered सुकाणूn, सुकाण n, कर्ण m (Sk.). [ To FEEL THE H. ( जहाज) सुकाणाप्रमाणे वळणे.] २ the place, station or office of direction and administration नियंतृत्व n, सूत्रचालकत्व n, नियंत्याची जागाf.३ (a) a steersman सुकाण्या. (b) ( hence) a guide, a director नियंता, सूत्रचालक, मार्गदर्शक, वाटाड्या, कर्णधार, उपदेष्टा. Helmless a. बिनसुकाणूचा.२ ताळतंत्ररहित.Helm'sman n. सुकाण्या, सुकाणदार, कर्णधार. २ (fig.) नियंता, चालक, कर्णधार.
Helm, Helmet (helm, hel'met) [A. S. helm -helan, to cover. Ger. helm.] n. a covering of armour for the head (लढाईचे वेळी संरक्षणासाठी) डोक्यास घालण्याची लोखंडी टोपी f, जिरेटोप m, जरीटोप m, जंजीरटोप m, शिरस्त्राण n, झिल्लीमn. २ that which resembles a helmet in form, position, etc. शिरस्त्राणासारखी टोपीf. ३ chem. the upper part of a retort नलिकामुकुट m. Helm'ed, Hel'meted a, covered with a helmet शिरस्त्राण घातलेला. Hel metless a. शिरस्त्राण नसलेला, शिरस्त्राणरहित. Helmet-shaped a.
Helminthic ( hel-min'thik) [ Gr. helmins, helninthos, & worm -helisso, to wriggle.] a. pertaining to worms कृमिसंबंधी. २ expelling worms कृमि घालविणारा. कृमिसारक. Helminthiasis n. med. a disease in which worms are present in some part of the bodyaकृमिरोग m. Helminthoid a. worm-like कृमीच्या आक्रतीचा, अनुकृमि. Helminthologist n. कृमिशास्त्रवेत्ता. Helminthology n. the natural history, or study, of worms कृमिविज्ञान n, कृमिशास्त्र n.
Helot (hel'ot or he'lot) [ Gr:; said to be derived from Helos, a town in Greece, reduced to slavery by the Spartans. ] n. a Spartan slave हेलट, स्पार्टीमधील गुलाम m. २ ( hence) a serf दास m, बंदा m, नोकर m. He'lotism n. गुलामगिरी f,दास्य,, दासत्व n. He'lotry n.pl. slaves गुलाम m. pl., दास m. pl.
Help (help) [ A. S. helpan, Ger. helfen, to aid. Sk. कृप, to be fitting. ] v. t. to furnish with strength of means, to aid, to assist मदत करणे, साहाय्य देणे, कमक करणे -पाठवणे -देणे, हात देणे लावणे, हातभार लावणे, आंग n -डोईf-खांद m -पाठ f. देणे, पाठीशी घेणे -घालणे, (-पासून) बचाव करणे, निभावून नेणे. २ to change for the better, to remedy (-ला) उपाय m -इलाज m -यन m. करणे, सुधारणे, (ची) दुरुस्ती करणे. ३ to prevent, to hinder निवारणे, टाळणे, बंद करणे. पाडणे, (ला) तोड काढणे, थांबविणे. ४ to forbear, to avoid धीर -दम धरणे, थांबणे, (कोणतीही गोष्ट केल्या.) शिवाय राहणें ; as, "I cannot help remarking &c." ५ to wait upon (as the guests at table) by carving and passing food (पदार्थ कापून) घालणे, वाढणे, (जेवणाची) बडदास्त ठेवणे. To H. forward पुढे ढकलणे, (पढे नेण्यास) हातभार लावणे. To H. off नेण्यास-घालविण्यास मदत करणे. To H. on हातभार लावणे,