पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1802

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिंतामणि. Healing a. बरे करणारा, रोगन, औषधी, ओखद, रोगशांतिकर.
Heald, See Heddle.
Health (helth) [A. S. halth -hal, whole. ] n. wholeness or soundness of body आरोग्यn, खुशालीf, कुशल n, रोगमुक्तताf, निरोगीपणा m. २ soundness and vigour of mind चित्तसमाधान n, स्वास्थ्यn.३ a wish of health and happiness ( as in pledging a person in a toast) आरोग्यचिंतनn , आरोग्याची खुशालीची इच्छा f. [To DRINK TO THE H. of (-च्या) आरोग्यार्थ पानविधि करणे.] Healthful a. full of health, free from illness of disease निरोगी, निरामय, रोग नसलेला. २ serving to promote the health of, salubrious, salutary शरीरास चांगला, आरोग्यदायक, हितकर, पथ्यकर. ३ indicating, characterized by, or resulting from, health or soundness आरोग्यदर्शक, आरोग्यसचक. Health'. fully adv. निरोगीपणाने, निरोगी स्थितींत. Health fulness n. आरोग्यसंपन्नताf, निरामयताf. Healthily adv. आरोग्यपूर्वक. Healthiness n. आरोग्यn , नि. रोगीपणा m, निरामयताf. Healthy a. being in state of health, hale, sound. निरोगी, रोगरहित, आरोग्ययुक्त.२ evincing health आरोग्याचा, आरोग्य दर्शक, आरोग्यसूचक. ३ conducive to health, whole. some आरोग्यप्रद, आरोग्य देणारा.
Heap (hēp) [A. S. heap; Icel. hopr, Ger. haufe.]n. a crowd, a throng, a multitude गर्दीf, जमावm, समूह m, संघ m. २a great number or large quantity of things रासf, ढीग m, ढिगार m, ढिगाराm, राशीf, गोळा m, जमाव m, पुंज m, पुंजा m, गंज सांठा m, समुच्चय m. H. as scratched by ants and rats उकर m, उकीर m, dim. उकरीf. H. v. t. to collect in a great quantity, to lay up साठवणे सांचवणे. जमविणे. २ to throw or lay in a heap, t make a heap of रास करणे, ढीग घालणे, ढिगारा करण To H. up above the measure शीग भरणे -लावण. Heaped a. Heaper n. रास करणारा. २ सांठवणारा. Heaping pr. p. and v. n. सांठवणेn. २ रास करणेn.
Hear ( hēr ) [ A. S. hyran; cf. Hark, Hearken. ] v. t. to perceive by the ear (कानांनी) ऐकणे, एक येणे in. con. with ला of s., श्रवण करणे, (च्या), कानी पडणे -येणे, परिसणे. २to listen to, to heed ऐकन घेणे, (क) कान लक्ष ध्यान देणे लावणे , (चे बोलणे) मनावर घेणे. [ TO REFUSE TO H. कान झाडणे.] ३to accede to the demand or wishes of (चे) ऐकणे, (ची) गोष्टf, म्हणणे n. मान्य कबूल करणे, (ला) रुकार देणे. ४ to examine तपासणे, (-ची) तपासणी करणे, तपासून पाहणे. ५ to try Judicially (खटला) ऐकणे, न्यायसभेत सुनावणी ऐकणे. ६ to attend to (-ला) हजर राहणे. ७ to give attention to लक्ष लावून ऐकणे. To H. a bird