पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1793

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

pursue, then to persecute, to dislike greatly.]v. t. to dislike intensely अत्यंत द्वेष तिटकारा तिरस्कार करणे g. of. o., डोळ्यांत सलणे in. com. g. of s., वैर दुस्मानी धरणे करणे. २to be very unwilling ( followed by an inf., or a substantive clause with that) न आवडणे in. com. with ला of s., (एखादी गोष्ट करण्यास) नाराज -नाखुष असणे; as, "To H. to get into debt." Script. to love less, relatively (-चर) कमी प्रीति करणे. H. n. extreme dislike, hatred, detestation (oppo. to love ) द्वेष m, तिरस्कार m, तिटकारा m, वैर n, आदावतf, दुसानपणा m. [CORCEALED H. गोवरीची आगf, झांकलेलें वैरn. DIRE AND DEADLY H. (between two parties) बारावा बृहस्पति m. FIXED AND DEADLY H. उभा दावा m, उमें वैर n, हाडवैरn , खडाष्टक n. INNATE Or INSTINCTIVE H. जातिवैर n, स्वभाववैर n.] Hat'able a द्वेष्य, द्वेषणीय, तिटकारा येण्यासारखा, द्वेषाई, द्वेषास्पद. Hateful a. (R.) manifesting hate द्वेष करणारा, वैर धरणारा. २ odious, exciting hate द्वेपार्ह, द्वेषणीय, द्वेष्य, द्वेषास्पद, खंवचट, ओंगळ, कुस्सनीय. Hatefully adv. Hatefulness n. द्वेषाहता f, &c. Hater n. द्वेष करणारा, विद्वेषक. Hatred n. द्वेष m, वैर , दावा m.
Hauberk ( haw'bėrk ) [O. Fr. hauberc-O. Ger. hals, the neck, and bergan, to protect.] n. a coat of mail formed of rings interwoven (लोखंडी लहान लहान वाटोळ्या कड्या एकमेकांत गुंफून केलेले) चिलखतn.
Haughty (hawt'i ) [M. E. hautein-O. Fr. hautain, haut, high-L. altus, high. याचा मूळ अर्थ 'उंच, उत्तंग' असा होता.] a.(of persons) contemptuously proud, arrogant मगरूर, अति गर्विष्ठ, ताठ, बेगुमान, दिमाखी, दिमाखखोर, चढेल, तोरेखोर, अविनीत, मद्रमस्त. २ (of things) indicating haughtiness दिमाखाचा, मगरूरीचा, तोन्याचा. Haughtily adv. मगरूरीने, गर्विछपणाने, आख्यतेनें, दिमाखाने, बेगुमानपणाने. Haughtiness n. मगरूरीf, दिमाख m, आत्यताf, गर्व m, अभिमान m, बेगुमानपणा m, तोराm, ताठा m, बदमस्तीf&c.
Haul (hawl) [A. S. holian, to get; Ger. holen, to fetch or draw.] v. t. to draw or pull with violence on force, to drag ओढणे, खेचणे, ओढीत-खेंचीत नेणे, जबरदस्तीने खेचणे. To H. over the coals colloq. to call to account, to scold or censure हाताशी धरणे झाडणे, खरडपट्टी काढणे, हांसडणे. To H. to the wind naut. गलबताची नाळ वाज्याच्या दिशेकडे वळविणे, H. v. i. to change the direction of a ship by hauling the wind वाज्याच्या दिशेकडे नाळ वळवन गलबताच्या गतीची दिशा फिरविणे. २ to pull apart (as oxen) (गाडीच्या बैलाने) बाहेर ओढ घेणे. To H. around naut. (said of wind) होकायंत्राप्रमाणे (वारा) वाहणे. To H. off to withdraw, to draw back माघार घेणे, पाऊल मागे घेणे, चार पावले दूर सरणे. H. n. a violent pull (जोराचा) हिसका m. २ (a) a single