पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1791

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. the edible viscera ( as the heart, liver, &c.) of a beast, esp. of a hog पशूचे (विशेषकरून दुकराधे) पोटांतील खाण्यासारखे अवयव m. pl.
Hasp ( hasp) [A. S: hapse, a clasp. ] n. the clasp of a padlock कडी f. pa spindle to wind yarn or thread on (सुत गुंडाळण्यादी)चातीf. H. v. t. कडी घालणे -लावणे.
Hassock ( has'uk) [ W. hesgog, sedgy -hesg, sedge.] n. a thick mat for kneeling on in church facia प्रार्थनेचे वेळी गुडघे टेंकण्याची गवताची जाड चटईf.
Hastate, Hastated (hast'āt,-ed) (L, hastatus -husta, spear.] a. shaped like a spear भाल्यासारखें, भाल्याच्या आकृतीचे, भालाकार.
Haste (hāst) [ O. Fr. haste (Fr. hate), of Ger. origin, Dut. haast. All perhaps from the root of Eng. hate in an earlier sense of, to pursue. ]n. celerity of motion, swiftness ( applied only to voluntary beings, as men and other animals) शीघ्रगतिf, स्वरा f, जलदी f. २ hurry, urgency धांदलf, घाईf, जलदीf, निकडf, तांतडf, चपळाईf, लगबगf. ३ rashness, vehemence उतावळ or उतावळीf, आवेग m, गडबडf. To make H. जलदी स्वरा करणे. H., Hasten v. t. to hurry on to drive forward घाई करणे, जलदी -त्वरा करणे, जलदीवर त्वरेवर घेणे आणणे, लवकर घडवून आणणे. H. v. i. to move with speed जलदी -स्वरा करणे, लगबगीने चालणे जाणे -येणे. २ to be in hurry धांदलीत -गडबडीत -गदर्दीत असणे. Hastener n. Hastily adv. in haste घाईने, जलदीने, त्वरेने, लवकर, चपळाई करून. २ without due reflection, rashly उतावळीने, उतावळेपणाने, धांदरटपणाने, मागे पुढे पाहिल्यावांचून,(मागचा पुढचा) विचार न करितां, हडपणाने, अल्लडपणानें. ३ Shakes. passionately, impatiently रागाचे भरांत -आवेशांत, तापटपणाने, लगबगीनें. Hastiness 2. जलदी f, स्वरा f, घाईf, चपळाईf. २ उतावळ or उतावळीf, धांदलf, अविचार m, अविवेक m. ३ संताप m, राग m, लगबगf. Hastings n.pl. early vegetables हळवा भाजीपाला m. Hasty a. (-of persons) precipitate, rash धांदरट, अविचारी, हूड, अल्लड, अविमृश्यकारी. २ ( of things ) घाईघाईनें उतावळीने केलेला. ३ धांदलीचा, उतावळीचा. ४ तापट, रागाचा, रागीट.
Hat ( hat ) [ A. S. hcet, connected with Sk. छद्, to cover. ] n. a covering for the head (साहेबी) उभी टोपीf. [H. BLOCK टोप्या करण्याचा ठोकळा m. THE EIGHTEEN Hats the European or hat-wearing nation अठरा टोपीवाले, अठरा टोपकर, अठरा टोपस. TO PASS AROUND THE H. वर्गणी गोळा करण्यासाठी टोपी फिरविणे.]H.-band n. टोपीवर गंडाळण्याची पट्टीf. H.-box n. टोपी ठेवण्याची पेटीf. Hatted a. टोपी घातलेला. Hater a. टोप्या करणारा -विकणारा, टोपीकार, टोपीवाला.
Hatch (hach) Fr. hacher, to chop, to hack.) v. t.