पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1786

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

N. B.-Hark is now rarely used as a verb except in the imperative form used as an interjection.
Harlequin (här'le-kwin or kin) [Fr. arlequin,formerly written also harlequin, prob. the same as O. Fr. Hellequin, a devil in medieval legend. याचा मूळ अर्थ (इटालिमन) प्रहसनांतील थडेखोर पात्र' असा होता.]n. buffoon, a merry-andrew विदूषक m, मस्कया m, वैहासिक m. H.v.i. to make sport by playing ludicrous tricks (वेगळ चेष्टा करून) मस्करी करणे गंमत दाखविणे. H. v.t. to conjure away नजरबंद करून लांब नेणे दर करणे. Har'lequinade n. ज्यांत विदूषकाचे काम पुष्कळ असते असा खेळm, विदूषकप्रधान प्रहसन n.
Harlot (harlot) [O. Fr. arlot, herlot, a base fellow. Of uncertain origin; perhaps from O. R. Ger. kerl. या शब्दाचा मूळ अर्थ "हलक्या -नीच कुळातील" किंवा "हलकट वर्तनाचा, लफंगा, भामट्या" असा होता. परंतु हल्ली त्या अर्थी याचा उपयोग करीत नाहीत.] n. a prostitute कसबणि,f वेश्याf, रांडf, रंडीf, आणिकाf, वारांगना f(Sk.), पण्यांगना f(Sk. ). वारवधू,f बाजारबसवी बायकोf, कलावंतीणf, कंचनीf" बाजारीणf, बाजारची खाटf, वेसवारूपाजीवा माल जादीf, उष्टी पत्रावळ f. २ strumpet छिनाल खीf, व्यभिचारिणीf, कलटा f, असतीf, असाध्वीf, शिनल शिंदळ बायकोf. H. a. wanton, lewd उनाड, छिनाल. H,v.i. कसविणीचा धंदा करणे. २ शिंदळकी करण. Har'lotrys. prostitution वेश्यावृत्ति f, कसविणीचा धंदा m. २ Lewdness छिनालीf, शिनळकीf, शिंदळका f. ३ anything meretricious बाह्यरुचिर दिखाऊ वस्तf, दिखाऊपणा m, बाह्यशोभा f, बाह्यरुचिरता f.
Harm (hārm) [A. S. hearm, akin to Ger. harm, grief'; cf. Sk. श्रम, toil, fatigue.]n. injury इजाf, दुखापतf, अपकार m, उपद्रवm, अपायm, पीडाf, दुःख n. २ damage, detriment नकसान n, नुकसानी f, नाश m, हानि,f क्षतिf, खराबीf. [ WHAT H. DOKS IT DO TO YOU ? त्यांत तुझें काय जाते?] ३ moral wrong दोष m, अपराध m, पापn, गुन्हा m. H. v. t.to injure दुखापत अपकार करणें, दःख देणे, उपद्रव करणे -देणे. २ to damage (च) नुकसान -हानि करणे. २ to wrong गुन्हा -अपराध करणे g. of s. Harmed P. t. and p. p. Harmful a. अपायकारक, अपकारक. २ घातक, नुकसान करणारा. Harmfully adv. Harm'. fulness n. Harming pr. p. and v. n. Harm'less a. innocent गरीब, निरुपद्रवी, बापडा, बापुडवाणा, सालस. २ unhurt शाबूत, हजा न पोचलेला, सुरक्षत, सुखरूप. ३ निर्दोष, निरपराध, निष्पाप. Harmlessly adv. Harmlessness n. निरुपद्रवीपणा m. २ सुरक्षतपणा m, सुखरूपताf. ३ दोषराहित्य,n निरपराधताf.
Harmonic a. See under Harmony.
Harmony (hār'mo-ni) [Fr. harmonie -L. harmonia-Gr. harmonia-harmos, a fitting-arein,