पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1775

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाती घेतलेला, चालू -सुरू असलेला केलेला. २ रोकड, पाशी -जवळ असलेला, रोख ; as, "Cash in hand". In one's H. or H.s (स्वतःच्या) ताव्यांतील हातांतील. ३ at one's risk or peril स्वतःच्या हिंमतीवर, हातावर as, "I took life in my hand." मी आपले प्राण हातावर घेतले. Laying on of H.s a form used in consecrating to office, or in blessing persons दीक्षा देतांना (मस्तकावर) हात ठेवणे, आशीर्वाद देणे. Light H. ढिला हात m, ढिली दोरी f, ढिलेपणा m, सढळपणा m, नरमपणा m. Note of H. a promissory note (पैसे उसने घेतल्यावर ते परत देण्याचा) वचनलेख m. Off H. or out of H. forthwith ताबडतोब, बिनतकरार, हातासरसा, सहज, हातावर. Off one's H.s हातावेगळा; as, "I have got that job off my hands." Old H. अनुभवी -जुना सनुष्य. Poor H. साधारण 'चालचलाऊ मनुष्य. On H. हातांस, जवळ, शिल्लक us, " A supply of goods on H." On one's H.s (आपल्या) ताब्यांत, हातांत, देखरेखीखाली. Right H. place of honour, power, and strength उजवा हात m (fig. and colloq.), मानाची अधिकाराची जागा f. Slack H. carelessness, sloth हयगय f, आळस m. Strict H. vigorous discipline करडा अंमल m, कडक कायदा m, कायदेशीरपणा m, जरब f. Under one's H. स्वदस्तरचा. Under the H. of(-च्या) हातचा, (-च्या) सहीनिशी -सहीचा. To bear a hand naut. ताबडतोब मदत करणे, मदतीला धावणे. To be H. and glove, or in glove, with, See under Glove. To be on the mending H. जगत्या पंथास लागणे, (रोग्याला) उतार लागणे, दिवसेंदिवस प्रकृति सुधारत जाणे. To bring up by H. (आंगावरील दूध न पाजतां मुलास नुसते) खावयास घालून पोसणे वाढविणे. To change H.s पक्ष-धनी बदलणे, एकाच्या हातांतून दुसन्याच्या हाती जाणे, एका पक्षाकडून दुसरे पक्षास मिळणे. To clap the H. आनंददर्शक टाळ्या वाजविणे, टाळ्या वाजवून आनंद दर्शविणे. To come to H. पाँचणे, पावणे, मिळणे, हाती लागणे, स्वाधीन होणे. To get one's H. in (कोणत्याही कार्याला कामाला) हात घालणे, सुरवात करणे. २ (एकाद्या कामाची) संवय माहिती होणे. To have a H. in (एखाद्या गोष्टीशी आपला) संबंध असणे, (-आंत) हात हितसंबंध असणे, ( मध्ये) अंग असणे. To have in H. (आपल्या) ताब्यांत -हातांत -अधिकारांत असणे, हुकुमांत असणे. २ (-मध्ये) व्यापृत असणे, गुंतून राहणे असणे. To have one's H.s full हाताला वार नसणे, न फावणे, पुष्कळ काम असणे, कामाचा रगाडा असणे. २ अडचणींत -प्रसंगांत असणे -पडणे. To have, or get, the ( higher ) upper hand of (-वर) सरशी करणे, (चा) पाडाव -पराजय करणे, चीत करणे. To his hand, To my H., &c. पूर्ण, तयार, तयारीत; as, "The work is made to his H." To hold in H. ताब्यांत ठेवणे, नियमन करणे, आवरणे. To lay hands on पकडणे,