पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1656

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Give ( giv ) [ A. S. gifan, to give. ] v. t. to vestow, to impart; as, (a) (without compensation) देणे, दान n. करणे g of o., अर्पणे, अर्पण n. करणे, समर्पणे, समर्पण करणे, बहाल करणे; as, “ For generous lords had rather G. than pay." २ to deliver over (in exchange for something ) (-ची किंमत मोबदला म्हणून) देणे, स्वाधीन करणे; as, “ We G. the value of what we buy." ३ to yield, to furnish, to produce देणे, उत्पन्न करणे, (:च्या पासून) निघणे, उत्पन्न होणे मिळणे in. con.; as, “ Flint and steel G. sparks." ४ to communicate, to pronounce (as advice, tidings, sentence &c.) (अभिप्राय, मत, बातमी, खबर, शिक्षा) देणे -सांगणे, जाहीर करणे, माहीत प्रसिद्ध करणे, निवेदन करणे. ५ to permit,to allow, to license परवानगी f, मोकळीक f. देणे, (-च्या) नशिबी येणे in. con.; as, “It is given me once again to behold my friend." ६ to produce as a result, to show देणे, (-वरून) हिशोब m -आकार m होणे -निघणे बसणे: as, "Eight divided by four gives two." ७ to devote, to apply (also used reflexively ) (कडे तनमनधन) देणे -लावणे -अर्पण करणे, (-मध्ये) रत निमग्न होणे, (ला) सर्वस्वी वाहून घेणे, (चा) छंद लागणे in. com. with ला of s.; as, “ The soldiers G, themselves to plunder.” ८ to allow or admit by way of supposition (कबुली &c.) देणे, कल्पना करणे, (घटकाभर) मानून चालणे, गृहीत धरणे; as, "I G. not heaven for lost." ९ to attribute, to adjudge (-शी) जोडून देणे, (शी) संबंध लावणे जोडणे, as, "I don't wonder at people giving him to me as a lover.” १० to cause, to make ( with the infinitive) समजूत करून देणे, (अमुक एक प्रकारची) समजूत f-ग्रह m करणे, मानावयास लावणे; as, " To G. one to understand." To G. away to make over to another, to transfer (दुसऱ्यास) देऊन टाकणे, (वरील आपली मालकी सत्ता) सोडून देणे, सोडणे, (दुसऱ्याच्या) ताब्यात देणे -नांवाने करून देणे: as, "To G. away one's daughter in marriage." To G. back to return परत देणे करणे, परतणे, वळता-पाठीमागें -पाठी देणे. To G. birth to (a) to bring forth ( as a child ) प्रसवणे, जन्म देणे. (b) to originate, to bring into existence ( as an enter prise, ideas, institution) (कोणतीही गोष्ट -कल्पना -संस्था अस्तित्वांत आणणे, प्रसवणे, आरंभ करणे, (प्रथम) काढणे To G. chase to pursue (-ची) पाठ घेणे, (च्या) पाठीमारे -मागे पाठीस लागणे, (ची) पिच्छा पुरविणे. To G. forth to publish, to tell जाहीर प्रसिद्ध सर्वश्रुत करणे. प्रकाशित करणे, बाहेर पाडणे, (ची) माहिती बातमी देणे. To G. ground to yield advantage, to recess (श्रेष्ठ -वरिष्ठ वरचढ शत्रूपासून) मागे हटणे; as " These nine began to give me ground." २ हार -कच खाणे, हार जाणे, माघार घेणे, ढिला पडणे. To G.