पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1631

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

off." Air G. ज्वालाग्राही वायशी मिश्र झालेली हवा f. Gas-burner n. धुराच्या दिव्याची खोळ f. G. coal धूर तयार करण्याच्या कामी उपयोगी पडणारा कोळसा m. G. fitter धुराच्या दिव्यांकरितां नळ्या वगैरे बसविणारा. G. meter धूर किती वापरला गेला हे मोजण्याचे घड्याळ m. G. stove धुराने सैंपाक करण्याची चूल f, धुराची चूल f. G. trap घाणेरी हवा बाहेर लावून देण्याचा पिंजरा m. G. washer टारपासून ग्यास निराळा करण्याचे यंत्र n. G. water (धुर शुद्ध केलेले) धुरकट पाणी n. G. works धूराचा कारखाना m. Laughing G. हंसे उत्पन्न करणारा एक प्रकारचा वायु m. Marsh G. दमट जागेत उत्पन्न होणारा विषारी वायु m. Gasalier n. (also, Gasolier) धुराच्या दिव्यांचें झुंबर n. Gas'eous a. in the form, or the nature, of gas वायरूप, वायुसदृश. २ lacking substance or solidity, tenuous पोकळ, पोचट, दम नसलेला, निर्जीव, क्षुल्लक. Gasifica'tion m. वायुरूप देणे n, वाय्वीकरण. Gas'iform a. See Gaseous. Gas'ify v.t. (चा) वायु बनवणे, (-ला) वायुरूप देणे. G. V.i. वायुरूप होणें -बनणें. Gas'light n. धुराचा दिवा m, धुराची बत्ती f. Gas'ogen n. वायु उत्पन्न करण्याचे यंत्र m. Gas'olene or Gasoline n. ग्यासोलिन, कच्च्या पेट्रोलमचे भागिक ऊर्ध्वपातन करितांना त्यांतून ६००-७०°श उष्णमानावर निघणारा पदार्थ m. Gasom'eter n. वायुमापक m. Gasomet'ric,-al a. वायुमापकाने मोजलेला, वायुमापकाने दाखविलेला. Gasom'etry n. मिश्रणांत निरनिराळ्या वायूचे परिमाण मोजण्याची विद्या f, वायुमिति ( Cf. Geometry=भूमिति). Gas'oscope n. खाणीमध्ये प्राणघातक विषारी वायु आहे किंवा काय हे समजण्याचे यंत्र n, प्राणघातक वायुदर्शक. Gascon (gas'-kon) [Fr. ] a. of, or pertaining to Gascony, in France, or to the Gascons फ्रान्सदेशाच्या गास्कनी परगण्यांतील -परगण्याचा -परगण्यासंबंधी. २ गास्कन लोकांचा संबंधी, &c. G. n. a native of Gascony गास्कनी येथील रहिवासी, गास्कनीकर m. २ a boaster, a bully शेखी f, ऐट f -डौल m -घमेंड f,प्रौढी f, मारणारा, गर्विष्ट. गास्कनीकरांची गर्विष्ठपणाबद्दल ख्याति होती त्यावरून हा अर्थ निघाला आहे. Gas'conade n. a vaunt, a bravado, a bragging शेखी f. &c मिरवणारा, प्रौढी मारणारा, वल्गना f. करणारा. G. v. t. to boast, to brag, to bluster शेखी f, प्रौढी f, -डौल m. &c. मारणे -मिरवणे, &c. Gasconad'er n. Gasconade, see under Gascon. Gash (gash ) [ O. Fr. garser, to pierce with a lancet. Perh. from an assumed L. carpere, to separate into parts.] v. t. to make a long deep incision in ( especially applied to incisions in flesh) धाव m -वार m करणे, मांसापर्यंत जखम करणे, (मांसामध्ये) भोसकणे. G. n. a long and deep cut (esp. in flesh ) वार m, घाव m, (मांसामध्ये झालेली) मोठी जखम f, भोकसा or भोसका m, भगदाड n, दीर्घछेद m, दीर्घक्षत n.