पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1607

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

G (j) इंग्रजी वर्णमालेतील सातवें अक्षर आणि पांचवें व्यंजन. G ह्या व्यंजनाचे दोन उच्चार आहेत; (१) ग्, जसे :-gave, go, gun. (२) ज् , जसे :-gem, gin. लॅटिन भाषेतच G ह्या अक्षराचे स्वरूप तींतील मूळच्या ज्या अक्षराच्या स्वरूपांत थोडासा फरक करून कल्पिलें आहे; आणि ते मग तसेंच्या तसेंच इंग्रजीत घेतले आहे. २ mus. (a ) the name of the fifth note of the distonic scale of C major संगीतशास्त्रांत सप्तस्वरांतील पांचवा स्वर m, (अर्थात ) पंचम m. (b) G clef : the treble clef placed on the line in the stave appropriated to the note G.. पंचमचिन्ह n, गतिलिपीतील पंचमस्वरस्थानद्योतकचिन्ह n. ३ math. सातव्या स्थानाचे दर्शक चिन्ह n. (A, B, C, D, E, F, G.) ४ George, Gertrude इत्यादि विशेषनामांसाठी संक्षेपाने G हे अक्षर वापरतात. ५ इंग्रजी भौतिकशास्त्रांत गुरुत्वाकर्षणा ( gravity ) बद्दल g हे अक्षर वापरतात. ६ math. G. C. F. or G. C. M.(=Greatest Common Factor or Greatest Common Measure) अशा संक्षेपलिपीत G. 'महत्तम' (greatest) द्या अर्थी वापरतात. ६ फ्रीमेसन्सच्या भाषत G. M. ह्याचा अर्थ Grand Master असा आहे. Gab (gab ) [ Of A. S. origin. ] v. i. to talk idly, chatter, to prate बडबडणे, बकबकणे, बकवा f. pl. जल्पना f. pl. करणे, फात्या f.pl. करणे मारणे. G. n. colloq.) idle prate, unmeaning talk बडबड f, अकबक f, बकवा f, or m, जल्पना f, जल्प m. [ GIFT OF THE G. a talent for talking, facility of expression वाकप्रसाद m, जिव्हानुकूल्य n, अस्खलित वाणीचा प्रसाद m, जिभेची देणगी f.] २ (Scot. ) the mouth तोड n, मुख n. Gab'ber n. बडबड्या, बडबडणारा, बडबड -जल्पना करणारा &c. Gabardine, Gaberdine ( gab-er-dēn') [ Span gabardina, -Span. guban, a kind of great coat. ] n. (shakes.) a coarse frock or loose upper garment (formerly worn by Jews), a mean dress जाडाभरडा पोकळ चोगा m, ग्याबरडीन m. Gabble (gab-b'l ) | Perhaps frequentative of Gab v. i. Which see. ] v. i. to talk fast or without meaning, to jabber, to prate व्यर्थ बडबडणें, बडबड करणे, बकबक f, करणें, अर्थरहित भाषण करणे, भकणे. २ to utter inarticulate sounds with rapidity, to cackle like geese जलद जलद व अस्पष्ट शब्द उच्चारणे, वचावचा बोलणें. G. n. व्यर्थ बडबड f, निरर्थक अर्थरहित बोलणे n, बकबक f, बरळ f. २ गलगल f, वचावचा बोलणे n, बडबडाध्याय m, (colloq.) गुडगुड f. Gab'bler n. बडबड्या, वाचाळ, जल्पक &c. Gaberdine, See under Gabardine. Gabion (ga-bi-un ) [ It. gabbione, a large cage, L. cavea, is hull,w -L.cavus, hollow. See Gage. ]