पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1580

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f, तिऱ्हड f, घोरभय n, धैर्यभंग m, विक्षेप m, वैचित्य n. [TO TAKE or CONCEIVE F. धास्ती f. घेणे, वचक m वचका m- खाणे AND in com. बसणे, धास्ती f -ढासरा m. धरणे. त्रास m. पावणे, आंच f. बसणे in. con., दचक f, दचका m -धडकी f- धवका m. बसणे -भरणे in. com., डचकणे or दचकणे, वचकणे, बाचटणे, बाचकणे, अपधाकणे, धास्तावणे, भेदरणे, भिणे, मोळा m येणे in. con., घाबरणे, गांगरणे (or गेंगारणे, गेंगरणे, गोंगरणे ), गांगावणे, -in high degree as expressed by such phrases as TO BE FRIGHTENED OUT OF ONE'S WITS OUT OF ONE'S SEVEN BENSES, TO BE TERROR-STRUCK, TO BE STRUCK AGHAST &c., गर्भगळीत होणे, धावे n. दणाणणे in. con. g. of s., भुलीचे झाड n. भेटणे in. com., देव्हाऱ्यांत देव नाहीसा होणे g. of s., मलमूत्र n. होणे in.con., मृतप्रा-गतप्राण होणें, लेंडी f गाळणे, पांचावर धारण f. बसणे g.of. s., हगमूत f. लागणे-सुटणे in. com., छाती f, ऊर m. फाटणे g. of s., जीव or प्राण m. कालवणे g. of. s., चकरी f. गुंग होणे g. of s., चकरी f. भुलणे g. of s., पाय मोडणे, हातपाय गोळा होणे g. of s., वावरणे, धादरणे, इगुटणे, कान्हणे. ] F.n. a frightful woman हडळ f, जखीण f, कडकलक्ष्मी f. २ anything strange, ugly or shocking, producing a feeling of alarm or aversion (धास्ती किंवा तिटकारा उत्पन्न करणारी कोणतीही) विपरीत -हेंद्रवेंद्र विक्राळ स्वरूपाची वस्तु f. Fright, Fright'en v. t. to terrify. भिवविणे, भेवडावणे. भेडसावणे, भेदरावणे, दचकवणे, वचकवणे, भय n. भेदरा m. घालणे, धडकी f, भरविणे-बसवणे, भयभीत करणें, बुजविणे or बुजाविणे, ·in high degree, terrify, frighten out of one's wits, &c. पांचांवर धारण f. बसविणे g. of o., त्रेधा f -तिरपीट f करणे g. of o., देव्हाऱ्यात देव नाहीतसे करणे g. of o., धाबें n, दणाणविणे, घराची कौलें n. pl. हालविणे -पळविणे g. of o., खालचे पाणी वर करणे g. of o., माटमूट करायास लावणे, मृतप्राय -भयाकुल -भयाक्रांत &c. करणे. [ To F. INTO खूब भय घालून (कांहीं काम) करविणे.] Fright'ened a. भेवडावलेला, भयभीत, भययुक्त, भयान्वित, सभय, -in high degree; filled with, swallowed up by, overcome by fear, भयाक्रांत, भयग्रस्त, भयाकुल, भयपीडित, भयचकित, भयाधीन, कावराबावरा. Fright'ful a. shocking भयंकर, भयानक, भयजनक, अकटोविकट, अकराळ, अकराळविकराळ, घोर, कराल pop. कराळ, भेसुर. Fright'fully adv. Fright'fulness n. Frigid ( frij'id ) [L. frigidus, frigere, to be cold -L. frigus, cold.] a. cold (स्वभावतः व इतरांच्या सापेक्षतेने) थंड, शीतळ, शीत; as, "F. zone." २ dull and unanimated मठ्ठ, मंद, मंदोत्साहाचा, निरुत्साहाचा, विरस, प्रीतिशून्य, स्नेहशून्य, आदरशून्य. ३ impotent नेभळा, नपुंसक, बायला, बुळा, नामर्द. Frigid'ity n. coldness थंडपणा m, हिमता f, शैत्य n. २ stiffness and formality.(आदरशून्य) औपचारिक थंड वर्तन n. ३ ३ coldness of affection स्नेहशून्यता f, प्रीतिशून्यता f. ४ want of heat or vigour निस्तेजस्विता f, कमजोर-